Just another WordPress site

यावल येथे ग्रामस्वराज्य अभियानाअंतर्गत दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीर उत्साहात

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी);-

जळगाव जिल्हा परिषदच्या माध्यमातुन जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन (आरजीएसए) कक्ष राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान २०२२-२३ अंतर्गत ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र जालना द्वारे तालुक्यातील ग्रामसेवक,सरपंच,उपसरपंच,आंगणवाडी सेविका यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

यावल पंचायत समिती सभागृहात गटविकास अधिकारी डॉ.मंजुत्री गायकवाड (बोरसे) यांच्या हस्ते राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानअंतर्गत आयोजित २७ व २८ मार्च या दोन दिवसीय प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबीराचे उद्घाटन करण्यात आले.याप्रसंगी शिबीरास सहाय्यक गटविकास अधिकारी किशोर सपकाळे,यावल पंचायत समिती विस्तार अधिकारी हबीब तडवी,शिबीर प्रशिक्षक दिपक शिंपी,दिपक पाटील,आभियान विस्तार अधिकारी व व्याख्याता म्हस्के,नागरे विस्तार अधिकारी व व्याख्याता जिटीसी जालना,ग्रामसेवक संघटनेचे यावल तालुका अध्यक्ष रूबाब तडवी,सचिव पी.व्ही.तळेले,सहसधिव हितु महाजन यांच्यासह ग्रामसेवक,१२ गावांचे सरपंच,उपसरपंच व ग्राम पंचायत सदस्य, अगणवाडी सेविका,आशा वर्कर यांनी भाग घेतला.या अभियाना अंतर्गत ग्रामपंचायत पातळीवर गावाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने ९ शाश्वत विकास ध्येयांच्या संकल्पनांचे उध्दीष्ट गाठण्यासाठी ग्रामीण पातळीवर समाजातील सर्व घटकांचा सहभाग असणे आवश्यक असावे या दृष्टीने महाराष्ट्र राज्यातील ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या माध्यमातुन गावपातळीवर आरोग्य,पाणी पुरवठा व स्वच्छता समिती स्थापन करणे, त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समिती,गाव तंटामुक्त समिती,वन हक्क समिती,पर्यावरण संतुलन,समृध्द गाव योजना अंतर्गत वृक्षारोपण समिती स्थापन करणे,सामाजिक लेखा परिक्षण समिती,शेतकरी गट,एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन समिती,बालसंरक्षण समिती आदी गावहिताच्या व विकासाच्या दृष्टीने पायाभुत सुविधांनीयुक्त स्वयंपुर्ण गाव अशा विविध संकल्पनाचे मार्गदर्शन या शिबीरात करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.