यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने भारत सरकार युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय तसेच राष्ट्रीय संचनालय द्वारा आयोजित औपचारिक शिक्षण व नियमित रोजगार नसलेल्या युवकांचे सर्वेक्षण अंतर्गत तालुक्यातील चितोडा या दत्तक गावी नुकतेच नियमित रोजगार नसलेल्या युवकांचे सर्वेक्षण करण्यात आले.
या सर्वेक्षणात मॉडेल एम-१ नमुना घेतलेल्या घराची ओळख व मॉडेल एम-२ सर्वेक्षण तारखेनुसार १५ ते २९ वर्ष वयोगटातील युवकांचे तपशीलवार माहिती घेण्यात आले.यात युवकांशी निगडित शिक्षण,व्यवसाय,रोजगार,बँक कर्ज आदी विषयांवर प्रश्नावलीद्वारे सर्वेक्षण करण्यात आले.या सर्वेक्षणाचे आयोजन जळगाव येथील कबचौ उमविचे रासेयो संचालक डॉ.सचिन नांद्रे,जिल्हा समन्वयक डॉ.मनीष करंजे, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे,उपप्राचार्य प्रा.अर्जुन पाटील,प्रा.एम.डी.खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.आर.डी.पवार,सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ.एच.जी.भंगाळे,प्रा.सुभाष कामडी यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.रासेयो स्वयंसेवक सचिन बारी,नवमेश्वर तायडे,यतीन पाटील,देवेंद्र बारी,डिगंबर बारी,गौरव पाटील,वैष्णवी धांडे,खुशी धांडे, वैष्णवी भंगाळे आदींनी सर्व्हेक्षणात सहभाग घेतला.