सादीक शेख
धामणगाव बढे (प्रतिनिधी):-
येथे राम जन्मोत्सवानिमित्ताने गावातून भव्य महायात्रा काढून राम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्तअलीम कुरेशी यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिक राम भक्तांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यानिमित्त येथील राम मंदिरापासून राम नामाच्या गजरात भगव्या पताका फडकावून तसेच डोक्यात भगव्या टोप्या परिधान करून गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणुकीमध्ये गावातील प्रतिष्ठित नागरिक व महिला तसेच मुस्लिम बांधव यांनी सुद्धा आपली उपस्थिती दिली होती हे विशेष !
सदरील राम जन्मोत्सव शोभायात्रेत एकता बंधुप्रेम व जातीय सलोखा यांचा आदर्श पाहायला मिळाला.या मिरवणुकी दरम्यान प्रभू रामचंद्र, लक्ष्मण,सीता माता व जानकी यांची सजीव वेशभूषा साकारण्यात आली होती.यावेळी राम नामाच्या घोषणेने गावातील वातावरण भक्तिमय होऊन नागरिकांमध्ये आनंद ओसंडून वाहत होता.प्रसंगी काँग्रेस नेते गणेशसिंग राजपूत,धनराजभाऊ घोंगडे महाजन,रवि महाजन,श्याम कानडजे,मुकुंद शिरसागर,वैभव मोदे तसेच गावातील सर्व धर्मातील तरुण व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनेउपस्थित होते.शोभायात्रा मिरवणुकी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस निरीक्षक सुखदेव भोरकडे मागर्दशनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.