अट्रावल येथील महामानवाच्या पुतळा विटंबणा प्रकरणी २o५ संशयितांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल,१५ जण ताब्यात
बाळासाहेब आढाळे
पोलीस नायक,मुख्य संपादक
तालुक्यातील अट्रावल येथे दि.३१ रोजी बारागाडयांवर बसण्याच्या कारणावरून वाद उफाळुन आल्याने या गोंधळात काही माथेफिरू समाजकंटकांकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबणा करण्यात आल्याने दि.१ एप्रिल रोजी दोन गटात दंगल होवुन त्यात एक महिला पोलीस अधिकारी यांच्यासह १४ जण जखमी झाल्याची घटना घडली होती.महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाची विटंबना झाल्याचे वृत्त कळताच जिल्हा पोलीस अधिक्षक एस राजकुमार,अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी,फैजपुर विभाग विभागीय पोलीस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे,स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे किसन नजन पाटील हे शनिवारी सायंकाळपर्यंत तळ ठोकून होते.याप्रकरणी दोन्ही गटासह शासनाचे वतीने पोलीस उपनिरिक्षक सुनीता मारूती कोळपकर व पोलीस कॉन्स्टेबल अशोक रमेश बाविस्कर अशा चार फिर्यादी दाखल झाल्या असून चारही फिर्यादीनुसार २o५ आरोपींविरुद्ध विविध कलमांसह दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरहू रात्री पोलिसांनी १५ जणांना ताब्यात घेतले असून गावात तणावपूर्ण शांतता आहे.तर महामानवाची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी विविध सामाजिक संघटना व समाजबांधव यांच्याकडून केली जात आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहीती अशी की,तालुक्यातील अट्रावल येथे श्रीरामनवमीच्या दुसऱ्या दिवशी बारागाडया ओढण्याची जुनी परंपरा गावात असून दि.३१ मार्च रोजी बारागाड्यांवर बसण्याच्या कारणावरून दोन गटात वाद झाला होता.सदरहू दुसऱ्या दिवशी दि.१ एप्रील रोजी नियोजनबद्ध पद्धतीने गावातील एका समाजातील माथेफिरू १० ते १२ समाज कंटकांनी मिळुन गावातील आंबेडकर नगर परिसरात रस्त्यालगत असलेल्या महापुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना घडली आहे.सदरील घटनेचे वृत्त समजताच जिल्हा पोलीस अधिक्षक एस राजकुमार,अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी,फैजपुर विभाग विभागीय पोलीस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे,स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे किसन नजन पाटील,यावल पोलीस उपनिरिक्षक प्रदीप बोरूडे,पोलीस उपनिरिक्षक अविनाश दहीफळे,पोलीस उपनिरिक्षक सुनिता कोळपकर,फैजपुरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्यासह दंगा नियंत्रण पथक,यावल,फैजपुर,जळगाव,रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे.महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा विटंबनानंतर झालेल्या दगडफेकीत दोन पोलिस कर्मचारी यांच्यासह दहा ते बारा जण जखमी झाले असुन त्यांच्यावर यावल ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.पोलिसांच्या तगडा बंदोबस्तामुळे अट्रावल गावात घटनास्थळी व गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.प्रसंगी अट्रावल गावात दंगलीनंतर सामाजिक सलोखा निर्माण व्हावा या दृष्टीकोणातुन रिपाईचे रमेश मकासरे,लक्ष्मण जाधव,जळगावचे मुकंद सपकाळे,रिपाई जिल्हा अध्यक्ष राजु सुर्यवंशी,निळे निशान सामाजिक संघटनेचे आनंद बाविस्कर यांच्यासह अनेक दलित चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते यांनी शांतता स्थापित करण्याकरिता विशेष सहकार्य केले आहे.तर महामानवाची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी विविध सामाजिक संघटना व समाजबांधव यांच्याकडून केली जात आहे.या घटनेसंदर्भात दि.१ मार्च रोजी रात्री उशीरापर्यंत दिवाकर सुपडू तायडे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
महापुरुषाच्या पुतळा विटंबन प्रकरणी २o५ संशयितांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल तर १५ जणांना पोलीसांनी केली अटक
अट्रावल येथे शनिवारी सकाळी दहा ते साडेदहा वाजेचे सुमारास दोन गटात झालेल्या हाणामारीत घटाकडील सुमारे १० ते १२ जण जखमी झाले होते.या प्रकरणी दोन्ही गटासह शासनाचे वतीने पोलीस उपनिरिक्षक सुनीता मारूती कोळपकर व पोलीस कॉन्स्टेबल अशोक रमेश बाविस्कर अशा चार फिर्यादी दाखल झाल्या असून चारही फिर्यादीनुसार २o५ आरोपींविरुद्ध विविध कलमासह दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दि.१ मार्च रोजी रात्री पोलिसांनी १५ जणांना ताब्यात घेतले आहे.
तालुक्यातील अट्रावल येथे शनिवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास दोन गटात तुफान दगडफेक करत लाठ्या-काठ्याचा वापर करून तुंबळ हाणामारी झाली होती यात दहा जण जखमी झाले होते.या संदर्भात शनिवारी रात्री उशिरा येथील पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गटाकडून तक्रार दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात एका गटाकडून ५७ तर दुसऱ्या गटाकडून ५१ यासह पोलीस प्रशासनाच्या वतीने फौजदार सुनीता कोळपकर यांनी दिलेल्या फिर्यादीत ९३ व पोलीस कॉन्स्टेबल अशोक बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ०४ अशा चार फिर्यादीनुसार २०५ आरोपींवर विविध कलमान्वये दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यात प्रशासन व दोन्ही गटाकडून दिलेल्या फिर्यादीतील काही संशयित आरोपींची नावे समान आहेत.आज दि.२ रोजी सकाळपर्यंत १५ संशयितांना पोलिसांनी अटक केली असून पोलिसांची धरपकड अद्यापही सुरूच आहे.
अट्रावल गावात तणावपूर्ण शांतता
शनिवारी सायंकाळपर्यंत पोलीस अधीक्षक एम राजकुमार,अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी,फैजपुर उपविभागीय पोलीस उपअधीक्षक डॉ.कुणाल सोनवणे,गुन्हा अन्वेषण विभागाचे किसन नजन पाटील हे तळ ठोकून होते.आज दि.२ रविवार रोजी पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांचे सह फैजपुर सपोनि सिद्धेश्वर आखेगावकर,अविनाश दहिफळे यांचेसह दंगल विरोधी पथक व पोलीस ताफा मोठ्या संख्येने तैनात करण्यात आला असून गावात तणावपूर्ण शांतता आहे.या ठिकाणी काल प्रशासनाच्या वतीने पोलिस अधिक्षक एम राजकुमार यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आणुन विधिवत पूजा करून बसविण्याकरिता विशेष योगदान दिले.नागरीकांनी याबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवु नये असे आवाहन फैजपुर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना केले आहे.