गोपाल शर्मा,पोलीस नायक
अमरावती जिल्हा (प्रतिनिधी):-
दिवंगत खासदार गिरीष बापट यांना युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने येथील मुख्य कार्यालयामध्ये नुकत्याच आयोजित कार्यक्रमात आ.रविभाऊ राणा यांच्या प्रमुख उपस्थितीत भावपूर्ण श्रध्दाजंली वाहण्यात आली.खा.गिरीश बापट हे अमरावती जिल्हयाचे असल्यामुळे त्यांचे निधन झाल्याने अमरावती जिल्हयासह संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे त्यांच्या आत्म्याला शांती मिळो व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना पुढील आयुष्याकरिता लढण्याची ताकद मिळो याकरीता दोन मिनिट मौन धारण करून प्रार्थना करण्यात आली.
या श्रद्धांजली सभेला जयंतरावजी वानखडे,जिल्हाअध्यक्षा ज्योतीताई सैरीसे,शहर अध्यक्षा सुमतीताई ढोके,अविनाश काळे,अर्चनाताई तालन, शोभाताई किटके,सिमाताई लवणकर,सविता नेवारे,वनिता तंतरपाडे,संगीता काळबांडे,वंदना जामनेरक,मिना आगासे,कल्पना शर्मा,प्रतिभा महाजन,किरण पोकळे,रेखा धोंगे,उज्वल पचलोड,शिल्पा मोकळे,वंदना कन्हाळे,अर्चना खासबागे,वर्षा पकडे,हर्षनंदा भुजाडे,कल्पना बनकर, आशा भस्मे,प्रतिभा बोरकर,मंदा राऊत,चंदा लांडे,सुनिता सावरकर,सविता नेवारे,अरुणा चचाने,मंगला जाधव,सविता मते,माया बिजवे,माया माहुलकर,मंदा तायडे,माला खुरसुडे,निता तिवारी,प्रमिला ससाने,सोनाली बहाळे,बेबी काळबांडे,अल्का मालखेडे,बबीता तिवारी,अर्चना प्रजापती,लताजी अंबुलकर यांच्यासह पार्टी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.