सादिक शेख
धामणगाव बढे (प्रतिनिधी):-
येथील पोलीस स्टेशन आवारात पोलीस निरीक्षक सुखदेव भोरकडे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक नुकतीच उत्साहात संपन्न झाली.आगामी काळात येणारे सण उत्सव याच्या अनुषंगाने गावात शांतता सुव्यवस्था व जातीय सलोखा कायम राहावा याकरिता सर्व समाज समावेशक अशा शांतता समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पोलीस निरीक्षक सुखदेव भोरकडे यांनी या बैठकीत बोलतांना सांगितले की,गावात शांतता जातीय सलोखा कायम राहावा यासाठी पोलीस प्रशासन आपले काम हे करीतच आहे पण यासाठी गावातील शांतता समिती सदस्य तसेच प्रतिष्ठित नागरिक यांची सुद्धा पोलीस प्रशासनाला साथ मिळाली तर गावात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही व गावातील नागरिकांशिवाय शांतता आबादीत ठेवणे शक्य त्यांनी यावेळी प्रतिपादन केले.
यावेळी भाजपचे नेते गजानन घोंगडे,जामा मशीदचे इमाम हनीफ मिल्ली,काँग्रेस नेते रवीशंकर शेठ मोदे,बिस्मिल्ला सेठ कुरेशी,बुलढाणा विधानसभा समन्वयक काँग्रेस नेते गणेश सिंग राजपूत,अलीम कुरेशी,भाजप नेते कृष्णा भोरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपापल्या समाजातील वरिष्ठ लोकांनी कोणताही प्रकार गावात घडला की त्याच्यात हस्तक्षेप करून आपापसात मिटवला पाहिजे व आपल्या गावातील जातीय सलोखा राखण्याची जी कायमची परंपरा आहे त्याला कोणत्याही प्रकारचा गालबोट लागणार नाही याची काळजी घ्यावी तसेच येणारे सण उत्सव शांततेने साजरे होईल व कोणत्याही गावात अनुचित प्रकार घडणार नाही यांची खबरदारी घ्यावी असे सांगितले.या बैठकीला गावातील प्रतिष्ठित नागरिक काँग्रेस नेते धनराज घोंगडे महाजन,शिवसेना ठाकरे गट राजू बोरसे,ग्रामपंचायत सदस्य जमीर कुरेशी,लक्ष्मण गवई तसेच गावातील जैन,मुस्लिम,बौद्ध व हिंदू समाजातील नागरिक उपस्थित होते.