यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
हिंदू मुस्लीम बांधवांच्या प्रमुख उपस्थितीत साजरे होणारे तसेच राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक असलेला व सुमारे एकशे विस वर्षांचा इतिहास लाभलेला येथील बालाजी महाराजांचा रथोत्सव व यात्रा दि.६ एप्रिल गुरूवार रोजी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात सपन्न झाले.रथोत्सवानिमित्त येथील शहराला लागून असलेल्या हरीता नदीपात्रात यात्रेदरम्यान खंडेराव महाराजांच्या बारागाडया ओढण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
महर्षी व्यास मंदिराजवळ दि.६ एप्रील रोजी सायंकाळच्या सुमारास विश्वस्त समितीचे अध्यक्ष नगराध्यक्ष चंद्रकांत देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत मंदार चंद्रकांत देशमुख यांच्या हस्ते सपत्नीक रथाची पारंपारीक पद्धतीने विधिवत पूजा करण्यात आली.यावेळी प्रा.मुकेश येवले, विजय सराफ,बापु जासुद यांच्यासह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.त्यानंतर हजारो भाविकांच्या उपस्थितीत सायंकाळी हरीता नदीपात्रात खंडेरायाच्या बारागाडया ओढण्यात आल्या.आज पहाटच्या सुमारास बालाजी महाराजांचा रथ शहरातील मुख्य रस्त्यावर भाविकांच्या दर्शनासाठी रथयात्रा काढण्यात आली.भाविकांच्या मदतीने शहरात ओढला जाणारा रथ मुख्य रस्त्यावर येतांना त्याच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याचे काम रथाच्या चाकांना मोगरी लावणारा करतो.ही मोगरी लावण्याची परंपरा रामजी मिस्त्री यांच्या वंशजा नंतर गंगाधर दांडेकर, बाबूराव सोनार,हरी मिस्त्री,अशोक लोहार यांचे सह सुतार,लोहार घराण्यातील परंपरा आहे सध्या दिलीप मिस्त्री,अशोक मिस्त्री व किशोर दांडेकर यांनी सांभाळत आहे.बालाजी महाराजांचा रथ शहराच्या मुख्य रस्त्यावर आला असल्याची सूचना दर्शनार्थी भाविकांना देणारे विशेष पारंपारीक वेशात असलेले भालदार व चोपदार गल्लीबोळात फिरुन भाविकांना बालाजी दर्शनासाठी आले आहेत आरती घेऊन चला अशी हाक देण्याची जबाबदारी शिवाजी चौधरी,राजू देशमुख,सुरेश वराडे पार पाडत आहे.रथ नदीवर धुवायला नेणे,त्याची रंगरंगोटी,तेलपाणी, फुलांच्या माळांनी,विद्दूत रोषणाईने सजविण्याचे काम बरडीवरील रहिवासी भागवत पवार,गोविंदा खैरे,माधव वराडे,भागवत ढाके यांनी केले.
सायंकाळी मार्गक्रमण करणारा रथ रात्रभर शहराच्या मुख्य रस्त्यावरून फिरुन पहाटे रेणूका देवीचे मंदिराजवळ आपल्या नियोजित स्थळी परततो.परिसरातील शेकडो नागरीकांच्या उपस्थित साजरे होणाऱ्या श्री बालाजी रथोत्सवाच्या मिरवणुकीसाठी विभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक प्रदीप बोरूडे,पोलीस उपनिरिक्षक सुदाम काकडे,पोलीस उपनिरिक्षक सुनिल मोरे,पोलीस उपनिरिक्षक सुनिता कोळपकर,राखील पोलीस दलाचे पोलीस उपनिरिक्षक प्रविण उमाळकर यांच्यासह पोलीसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.