यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील नगर परिषद प्रशासनाच्या दुर्लक्षीत व भोगळ कारभारामुळे मोकाट कुत्रे व डुकरांचा सर्वत्र मुक्त संचार वाढलाने ही एक नागरिकांसाठी मोठी समस्या निर्माण झाली आहे.तसेच यामुळे नागरीकांचे व त्यांच्या कुटुंबांचे आरोग्य धोक्यात आले असुन या विषयाची जिल्हाधिकारी व प्रशासक यांनी नागरिकांच्या आरोग्याची गांभीर्याने दखल घेवुन योग्य ती पाऊले उचलावी अशी मागणी यावल शहरातील नागरिकांकडुन करण्यात येत आहे.
यावल नगर परिषदच्या विस्तारित वसाहतीच्या कार्यक्षेत्रासह शहरातील विविध ठिकाणी मागील अनेक दिवसांपासुन मोकाट फिरणाऱ्या कुत्रे व डुकरांचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढले आहे.यात मोकाट फिरणारे कुत्रे व डुकरे हि फालक नगर,आयशा नगर,चांदनगर,पांडुरंग सराफ नगर, गंगानगर यासह शहरातील इतर सर्वच परिसरात राहणाऱ्या नागरीकांच्या पाळीव शेळ्यांचे पिल्लुंवर हल्ला करून त्यांना पळवुन घेवुन जात असल्याने नागरीकांचे मोठे आर्थिक नुकसान व रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांच्या मागे लागुन त्यांची त्रेधारिपीट उडवीत आहे.त्याचबरोबर डुकरांची मोठी संख्या वाढल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य झाल्याने डासांचा उपद्रव सातत्याने वाढत आहेत तसेच त्यामुळे सद्या यावल शहरात वेगवेगळया आजारांची साथ सर्वत्र पसलेली दिसुन येत आहे.नगर परिषदच्या आरोग्य विभागाकडुन या नागरीकांच्या आरोग्याशी निगडीत कोणत्याही संदर्भात गांर्भीयाने दखल घेतली जात नसल्याने प्रशासकीय कारभाराबद्दल नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी व प्रशासक यांनी तात्काळ नागरीकांच्या आरोग्याची काळजी घेत मोकाट फिरणारे धोकादायक कुत्रे व डुकरांची वाढलेली संख्या आटोक्यात आणण्याकरिता प्रभावी उपाययोजना करण्यात यावी तसेच शहरात मोठया प्रमाणात वाढलेल्या डासांचा उपद्रव थांबविण्यासाठी युध्द पातळीवर औषधींची फवारणी करण्यात यावी अशी मागणी शहरवासियांकडून केली जात आहे.