Just another WordPress site

भविष्यात कर्नाटकात निवडणूका झाल्यास आमच्या उमेदवारांना चिन्ह मिळेल-शरद पवार

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा):-
केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह तृणमूल काँग्रेस व भारतीय कम्युनिस्ट पक्ष या पक्षांचा राष्ट्रीय दर्जा काढून घेतला आहे मात्र त्याचवेळी आम आदमी पक्षाला आता राष्ट्रीय दर्जा देण्यात आला आहे.राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढून घेतल्याबद्दल पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले आहे की,राष्ट्रीय पक्ष याचा अर्थ एखाद्या पक्षाला ‘राष्ट्रीय’ पक्ष म्हणून मान्यता मिळते त्यामुळे देशातील कोणत्याही राज्यात त्या पक्षाचा उमेदवार उभा राहिल्यास अधिकृत चिन्हावर निवडणूक लढवू शकतो अशी प्रतिक्रिया त्यांनी एबीपी माझा’या वृत्तवाहिनीशी बोलतांना दिली आहे.

शरद पवार पुढे म्हणाले की,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय पक्ष म्हणून असलेली मान्यता रद्द करण्यात आली आहे हा निवडणूक आयोगाचा निर्णय आहे.यात चार राज्यांत ६ टक्के मते मिळायला हवीत असे निकष आहेत परीणामी महाराष्ट्र,नागालँड व अंदमान-निकोबारमध्ये तेवढी मते पक्षाला आहेत परंतु अंदमान-निकोबारची मते निवडणूक आयोगाने ग्राह्य धरलेली नाहीत असे शरद पवार यांनी नमूद केले.याचा परिणाम भविष्यकाळात कर्नाटकात निवडणूक झाल्यास आमच्या उमेदवारांना चिन्ह मिळेल मात्र निवडणूक प्राचारादरम्यान राष्ट्रीय वाहिन्यांवर मिळणारा वेळ कमी होणार आहे तसेच प्रचारासाठी ४० लोक असतात त्यातील ५० टक्के कमी होणार असल्याने त्याचा फटका आम्हाला बसेल असे शरद पवारांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.