यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
दागिने चमकवुन देतो असे सांगत एका अज्ञात भामटयाने पन्नास हजार रुपये किमतीची सोन्याची पोत लांबविल्याची घटना तालुक्यातील वढोदे गावात नुकतीच घडली असुन याबाबत यावल पोलीस ठाण्यात त्या अज्ञात भामट्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली सविस्तर माहीती अशी की,तालुक्यातील वढोदा येथील रहिवाशी सुरेश नामदेव चौधरी वय ७० वर्ष हे आपल्या कुटुंबासह गावात वास्तव्यास आहे.दि.१o एप्रील मंगळवार रोजी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास एक अज्ञात व्यक्ती हा सुरेश चौधरी यांच्या घरासमोर आला व चौधरी यांना म्हणाला मी जुने सोने पॉलीस करून देतो व त्यांना चमकवून देतो त्यावर त्याने चौधरी यांना घरातील जुनी वस्तु आणण्यास सांगीतली त्यानुसार सुरेश चौधरी यांनी पितळी तांबा त्याच्याकडे दिला त्या अज्ञात व्यक्तीने त्याच्याकडील लिक्विडने घासुन ती वस्तु चमकवुन दाखविली.त्यानंतर सुरेश चौधरी यांचा त्या व्यक्तिवर विश्वास बसल्याने त्याने सोन्याचे दागिने असतील तर द्या मी ते चमकवुन देतो असे सांगीतले.त्यानुसार सुरेश चौधरी यांच्याकडे त्यांची पत्नी उज्वला चौधरी यांनी आपल्या गळयातील अडीच तोळयाची पन्नास हजार रूपये किमतीची सोऱ्याची चैन त्यांच्या हातात दिली.यावेळी त्या अज्ञात भामट्याने चैनला हळद लावुन एका डब्यात टाकुन सदरचा डबा गॅसवर ठेवुन तो गरम केला त्यानंतर त्याने पाच मिनिटांनी डबा थंड झाल्यावर ती सोन्याची चैन काढुन घ्या असे सांगीतले व तिथुन निघुन गेला.दरम्यान पाच मिनिटांनी चौधरी यांनी डबा उघडल्यावर त्या डब्यात ती सोन्याची चैन दिसुन आली नाही त्यामुळे त्या अज्ञात व्यक्तिकडून आपली फसवणुक झाल्याचे कळताच सुरेश चौधरी यांनी यावल पोलिस ठाण्यात हि आपबिती सांगितली व त्यानुसार ती पन्नास हजार रूपये किमतीची सोन्याची चैन घेवुन पसार झालेल्या त्या अज्ञात भामट्याविरूद्ध सुरेश चौधरी यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली यावल पोलीस करीत आहेत.