यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित.कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्या.डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली “भारतीय संविधान व डॉ.आंबेडकरांचे योगदान”या विषयावर व्याख्यान कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.अर्जुन पाटील उपस्थित होते.कार्यक्रमाचे वक्ते प्रा.मिलींद मोरे यांनी आपल्या व्याख्यानातून भारतीय संविधानाची उदिष्ट्ये,भारतातील प्रत्येक नागरिकाचे सहा मुलभुत अधिकार,संसदेतील राज्यसभा,लोकसभा सभागृह, गोलमेज परिषद,राज्यघटना,मुलतत्व या विषयांवर सविस्तर विचार मांडले.तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष.प्रा.डॉ.एस.पी.कापडे यांनी स्वातंत्र्य, समता,बंधुभाव ही लोकशाहीची मुलतत्वे आहेत.प्रत्येकाने ती आचरणात आणायला हवी तसेच प्रत्येकाला स्वातंत्र्याचा अधिकार हा राज्यघटनेने नागरीकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणुन दिला आहे त्याचा योग्य वापर झाला पाहिजे असे त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.गणेश जाधव यांनी केले तर आभार प्रा.सुभाष कामडी यांनी मानले.यावेळी प्रा.डॉ.हेमंत भंगाळे,प्रा.शेखर चव्हाण, प्रा.मुकेश येवले,प्रा.डॉ.संतोष जाधव,प्रा.डॉ.वैशाली कोष्टी,प्रा.भारती सोनवणे,प्रा.राणे मॅडम,प्रा.छात्रसिंग वसावे,मिलींद बोरघडे,संतोष ठाकूर, रमेश साठे यांच्यासह विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.