Just another WordPress site

स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना सेवेतुन बडतर्फ करा

यावल तालुका मराठा समाज्याच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- स्थानिक गुन्हे शाखा जळगाव येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे मराठा समाजाची मोठ्या प्रमाणावर मानहानी झाली आहे.या प्रकरणामुळे राज्यभरामध्ये तीव्र संतापाची लाट उसळलेली आहे व याचे पडसाद यावल तालुक्यातील मराठा समाजामध्ये पाहायला मिळत आहे.यानिमित्त किरणकुमार बकाले यांना  तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्यात यावे या मागणीचे निवेदन यावल तालुक्यातील अखिल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार महेश पवार व पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांना नुकतेच देण्यात आले.सदरील निवेदन तालुक्यातील मराठा समाजाच्या वतीने भर पावसात व शेकडो समाजबांधवांच्या उपस्थितीत तहसीलदार महेश पवार व पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांना किरण बकाले यांना सेवेतून बडतर्फ करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आहे.प्रसंगी समाजबांधवांच्या वतीने तीव्र संतापजनक भावना व्यक्त करण्यात आल्या.तर किरणकुमार बकाले यांना बडतर्फ न केल्यास समाज्याच्या वतीने तीव्र स्वरूपाचे राज्यस्तरीय  आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

यावेळी यावल माजी नगराध्यक्ष अतुल पाटील,जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती रवींद्र पाटील,मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अजय पाटील,विजयकुमार पाटील किनगाव,दहिगाव उपसरपंच देविदास पाटील,देविकांत पाटील,वसंत पाटील,प्रा.संजय पाटील,प्रा.संजय कदम,छाया अतुल पाटील,वर्षा अजय पाटील,मनीषा गावडे,डी.सी.पाटील,ऍड.डी.आर.बाविस्कर,दिनकर क्षीरसागर,सुनील गावडे,डी.बी.पाटील,गणेश महाजन,ए.एन.यादव,एम.ए.पाटील,किरण शिंदे,बापु जासुद,तुषार येवले,दिलीप इंगळे,विजय येवले,हेमंत येवले,प्रा.मुकेश येवले,एकनाथ शितोळे,समाधान पाटील,दौलत मराठे,यशवंत जासुद,रवींद्र टोंगळे,यशवंत भोईटे,निलेश पवार,प्रकाश पवार,भुषण पवार,अशोक पाटील,शैलेश पवार,पप्पु पाटील,विजय यादव,गोपाल जासुद,विजय पाटील,समीर पवार,सुनील येवले,महेश पाटील,प्रवीण पाटील,अमोल खैरनार,एन.पी.चव्हाण,योगेश चव्हाण,अनिल सोनवणे,अक्षित जासुद,संजय पाटील,राकेश शिर्के,विलास पवार,नरेंद्र पाटील,गणेश येवले,गोकुळ भोईटे यांच्यासह समाजबांधव मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.