मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नुकतेच अयोध्या दौऱ्यावर गेले होते सदरील दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्याबरोबर अनेक आमदार,खासदार,नेते, पदाधिकारी व कार्यकर्तेही गेले होते मात्र या दौऱ्याला शिंदे गटातील अनेक नेत्यांनी दांडी मारलेली आहे.याबाबत आमदारांनी विविध कारणे देत अयोध्या दौऱ्यावर जाणे टाळले आहे यामुळे शिंदे-फडणवीस सरकारमधील अनेक आमदार अस्वस्थ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे.यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी नुकतेच भाष्य केले आहे.त्यांनी भाष्य करतांना म्हटले आहे की,जहाजातून जसे उंदीर पळतात त्याप्रमाणे सर्व आमदार हळुहळू शिंदे सरकारला सोडून जातील असे विधान एकनाथराव खडसे यांनी केले आहे त्यामुळे खडसे यांच्या या विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
शिंदे गटातील आमदारांच्या अस्वस्थतेबाबत भाष्य करताना एकनाथराव खडसे यांनी म्हणाले आहे की,मुख्यमंत्र्यांबरोबर अयोध्येला अनेक आमदार गेले नसून शिंदे गटाच्या आमदारांसह अपक्ष आमदारांमध्येही अस्वस्थता आहे.यात मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसून मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे गाजर नेहमी दाखवले जात आहे त्यामुळे आमदार बच्चू कडूंनी याबाबत अनेकदा विधान केलेली आहेत.तसेच आता मंत्रिमडळाचा विस्तार २०२४ च्या निवडणुका झाल्यानंतरच मंत्रीमडळ तयार होईल अशी उपरोधिक टीका बच्चू कडू यांनी केली आहे त्यामुळे या चर्चांना अधिकच बळ मिळत आहे.सदरील परिस्थितीमुळेच अनेक आमदार खासगीमध्ये बोलताना सरकारबाबत नाराजीची भावना व्यक्त करत आहेत त्यामुळे जेव्हा निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील आणि कोर्टाचा निकाल लागेल तेव्हा जहाजातून उंदीर जसे पळून जातात तसेच हे सगळे आमदार हळुहळू शिंदे सरकारला सोडून जातील असे भाष्य एकनाथराव खडसे यांनी नुकतेच केले आहे.