Just another WordPress site

डोंगर कठोरा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-

तालुक्यातील डोंगर कठोरा येथे न्यू सम्राट नवतरुण मित्र मंडळ व बौद्ध पंच मंडळ यांच्या वतीने आज दि.१४ एप्रिल शुक्रवार रोजी महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यानिमित्ताने दि.१३ एप्रिल रोजी रात्री १२ वाजता डॉ.आंबेडकर यांचा जन्मोत्सव फटाके फोडून व डीजेच्या तालावर नाचून साजरा करण्यात आला.तसेच दिवसभरात अनेक मान्यवरांच्या वतीने भगवान गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्त्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर संध्याकाळी ट्रॅक्टर वरून डॉ.आंबेडकर जयंती मिरवणूक काढण्यात आली.सदरील मिरवणूक आंबेडकर नगरापासून काढण्यात आली पुढे गावठाण परिसर,खालचे गाव भाग,ग्रामपंचायत जवळून राणे गल्ली,भिरूड गल्ली,गढीवरील विठ्ठल मंदिर,महादेव मारुती मंदिर, गावठाण परिसर व पुन्हा परत आंबेडकर नगर मध्ये मिरवणूकीचे विसर्जन करण्यात आले.या निवणुकीदरम्यान गावठाण परिसरात उंचावर फुग्यांचा भलामोठा झुंबर बांधण्यात आला होता मिरवणूक त्याठिकाणी आल्यानंतर त्यावर फुग्यांचा वर्षाव करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मिरवणूक रथाचे स्वागत करण्यात आले.तसेच संपूर्ण गावात विविध ठिकाणी जयंती मिरवणुकीत डॉ.आंबेडकर यांच्या मुर्त्यांचे पूजन करून स्वागत करण्यात आले.या मिरवणुकीत सर्व जातीधर्मातील बांधवांनी सहभाग नोंदविला हे विशेष ! या जयंतीनिमित्ताने डीजेच्या तालावर सर्व समाजातील समाजबांधवांनी नाचून डॉ.आंबेडकर जन्मोत्सव साजरा केला.या मिरवणुकीदरम्यान पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हेपोकॉ किशोर परदेशी,होमगार्ड संजय कुवर यांनी पोलीस बंदोबस्त चोख ठेवला.

डॉ.आंबेडकर जयंती मिरवणूक यशस्वितेकरिता सरपंच नवाज तडवी,उपसरपंच धनराज पाटील,ग्रा.पं.सदस्य दिलीप तायडे,जुम्मा तडवी,आशा आढाळे,अशोक तायडे,विजय आढाळे,अजय तायडे,आकाश सपकाळे,अरविंद मेघे,प्रदीप तायडे,कृणाल सोनवणे,आकाश ढोके,अरविंद पांडव,सुशील आढाळे,उमेश आढाळे,प्रांजल आढाळे,बुद्धभुषण आढाळे,दगडू तायडे,सत्यजित आढाळे,रवींद्र भालेराव,चंदन सोनवणे,अजय सोनवणे,आकाश आढाळे,पियूष वाघ,विश्वभूषण आढाळे,शैलेश वाघ,ज्ञानेश्वर आढाळे,विशाल अडकमोल,रोहित सपकाळे,सागर कोचुरे,आदर्श आढाळे,संजय आढाळे,सागर सपकाळे,सागर तायडे,विशाल सपकाळे, दादाराव पांडव,हिमांशू तायडे,महेंद्र सपकाळे,मयूर पांडव,सतीश आढाळे,मयूर सोनवणे,अक्षय तायडे,विजय तायडे,दीपक आढाळे,विकास तायडे,योगेश आढाळे,राकेश आढाळे,कुंदन आढाळे,किरण सोनवणे,दिपक कोचुरे,नितीन आढाळे,राजेंद्र पारधे,अनिल तायडे,अधिराज मेघे,चंदन सपकाळे,तन्वीर आदीवाले यांच्यासह गावातील सर्व समाजबांधवांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.