गोपाल शर्मा,पोलीस नायक
अमरावती जिल्हा प्रमुख
महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त अमरावती येथील डॉ.आंबेडकर चौक येथे एकता रॅली आयोजन समिती व नुपूर डान्स अकॅडमीच्या संयुक्त विद्यमाने नुपूर डान्स स्पर्धेचे आयोजन नुकतेच करण्यात आले.
यानिमित्त आयोजित नृत्य कार्यक्रमात कु.आराध्या सूर्यकांत दुधाने हिने नृत्य करून महामानवाला अभिवादन केले.यावेळी मंचावर पोलिस आयुक्त श्री रेड्डी साहेब,पोलिस उपायुक्त श्री साळी साहेब,पोलिस सहआयुक्त पुनम पाटील,राजूजी नन्नावरे,तुषारभाऊ भारतीय,सुदर्शनजी गांग,गोविंदभाऊ कासट,सलीम मिरावाले,प्रा.मनीष गवई आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी गुरुवर्य प्रकाश मेश्राम यांच्या मार्गदर्शनात लहानग्या मुलींनी भिमगितावर अतिशय सुंदर असे सामूहिक नृत्य करून महामानवाला अभिवादन करून उपस्थितांची मने जिंकली.प्रसंगी पोलिस आयुक्त श्री रेड्डी साहेब यांनी या चिमुकल्यांचे विशेष कौतुक केले.