गोपाल शर्मा ,पोलीस नायक
अमरावती जिल्हा प्रतिनिधी
“भीमा तुझ्या कृपेने जगतो आम्ही स्वाभिमानाने”चा नारा देत महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रात्री ठीक १२ वाजता स्थानिक डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथील महामानवाच्या पुतळ्याला खासदार सौ नवनीत रवी राणा व आमदार रवी राणा,रिपाई गवई गटाचे डॉ राजेंद्र गवई व अमरावतीचे कर्तव्यदक्ष पोलिस आयुक्त श्री रेड्डी साहेब यांच्यासह हजारो आंबेडकरी अनुयायांच्या साक्षीने अभिवादन करण्यात आले.तसेच यावेळी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पावन पर्वावर इरविन हॉस्पिटलचे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जिल्हा सामान्य रुग्णालय व इरविन चौकाचे डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक असे नामकरणही करण्यात आले.
यावेळी आयोजित कार्यक्रमात आमदार रवीभाऊ राणा व खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी आपण संविधानाचे आदरकर्ते असून बाबासाहेबांच्या कृपेनेच दीन दलीत शोषित पीडित वंचित यांच्या उत्थानासाठी सदैव कटिबध्द असल्याचे सांगूत असतांनाच खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक(जुना इरविन चौक)येथील पुतळा सौंदर्यीकरणा करीता १ करोड रुपयांचा निधी दिला जाणार असल्याची घोषणा केली असून आमदार रवी राणा यांनी भिमटेकडी सौंदर्यीकरणासाठी १० कोटी रुपये,बडनेरा समता चौक येथील पुतळा सौंदर्यीकरणा करिता २० लक्ष रुपये देण्यात येणार आहेत.तसेच आपल्या क्षेत्रातील २० विविध बुद्धविहार विकास कामांचे भूमिपूजनहि महामानवाच्या जयंतीदिनी करण्यात आले.शाहू फुले आंबेडकरी विचारांचा वारसा जोपासून जनतेला विकासाचा आरसा दाखवण्यासाठी आपण वचनबध्द असल्याचे सांगून महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असणारी समाजव्यवस्था निर्माण करणे हेच आपले लक्ष्य असल्याचे आमदार रवी राणा व खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी सांगताच उपस्थित हजारो अनुयायांनी टाळ्यांचा कडकडाट केला.तसेच यावेळी “जब तक सूरज चांद रहेगा,बाबा तेरा नाम रहेगा,”एकच साहेब,बाबासाहेब”आदी नारे लावून राणा दांपत्याने बाबासाहेबांना अभिवादन केले.
यानंतर आमदार रवी राणा यांनी बडनेरा येथील समता चौक,व डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे ढोल ताशांच्या गजरात महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन करून अभिवादन केले.यावेळी आमदार रवी राणा,खासदार सौ नवनीत रवी राणा यांच्या समवेत शैलेंद्र कस्तुरे,आशिष गावंडे,समाधान वानखडे,प्रा.संतोष बनसोड,जितु दुधाने,आश्विन उके,अनुप खडसे,लईकभाई,मनोज गजभिये,विलास वाडेकर,गनेशदास गायकवाड,साक्षी उमप,संतोष कोलटेके,मिरा कोलटेके,प्रवीण मोखले,अविनाश तापडिया,श्री ठक्कर, अविनाश काळे,धनंजय लोणारे,विकी बिसने,खूष उपाध्याय,अजय बोबडे,योगेश बनसोड,नंदा रामटेके,मंगेश चव्हाण,निखिल वावगे,राहुल काळे,शुभम उंबरकर,योगेश बनसोड,योगेश जयस्वाल,श्री गोंडाने,थोरात काका आदी मान्यवर उपस्थित होते.