Just another WordPress site

खासगी बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू ; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत जाहीर

मुंबई-पोलीस नायक (प्रतिनिधी):-

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर आज दि.१५ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला असून यात एक खासगी बस दरीत कोसळून झालेल्या या भीषण अपघातामध्ये १३ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.त्याशिवाय या बसमध्ये एकूण ४० ते ४५ जण प्रवास करत असल्याचीही माहिती मिळाली असून त्यामुळे मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यात प्रवाशांपैकी २० ते २५ जण जखमी झाल्याचेही सूत्रांकडून सांगितले जात आहे.

मुंबईच्या गोरेगावमधील बाजीप्रभू वादक गट (झांज पथक) हे पुण्याला एक कार्यक्रम करण्यासाठी गेले होते.सदरील वादक गट पुण्याहून परत येत असतांना त्यांच्या बसला जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर अपघात झाला.सदरहू शिंगरोबा मंदिराच्या अलिकडील घाटात ही बस पहाटे ४ च्या सुमारास बाजूच्या दरीत कोसळली असल्याबाबतची प्राथमिक माहिती आहे.रायगडच्या खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला असून अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.सदरील अपघात झालेला रस्ता हा घाट परिसर असल्यामुळे उतार खूप जास्त आहे त्यामुळे वाहन चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झालेला असण्याची शक्यता आहे.सदरील बसमध्ये एकूण ४१ प्रवासी प्रवास करीत होते त्यातील २७ प्रवाशांना वाचवण्यात यश आले असून इतरांनाही वर काढण्याचे काम प्रशासनाच्या वतीने केले जात आहे.सदर बचावकार्यात खोपोलीतील पथक,खंडाळ्यातील पथक,स्थानिक पोलीस,महामार्ग पोलीस यांच्याकडून विशेष सहकार्य केले जात आहे.उपलब्ध माहितीनुसार या अपघातात  १३ जण दगावले असल्याची माहिती वाहतूक पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांनी दिली आहे.दरम्यान घटनास्थळी वेगाने मदतकार्य हाती घेण्यात आले असून जखमींना खोपोली ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात येत आहे.मदतकार्यासाठी हायकर्स ग्रुप व आयआरबीचे पथक तैनात करण्यात आले असून खाजगी रुग्णालयातील डॅाक्टर्सना मदतीसाठी पाचारण करण्यात आले आहे.

मृतांची हाती आलेली नावे…१) जुई दिपक सावंत, वय १८ वर्ष,गोरेगाव,मुबई २)यश सुभाष यादव ३)वीर कमलेश मांडवकर,वय ६ वर्ष ४) वैभवी साबळे, वय १५ वर्ष ५) स्वप्नील श्रीधर धुमाळ वय १६ वर्ष ६) सतिश श्रीधर धुमाळ,वय २५ वर्ष ७) मनीष राठोड,वय २५ वर्ष ८) कृतिक लोहित, वय १६ वर्ष,गोरेगाव, मुंबई ९) राहुल गोठण, वय १७ वर्ष,गोरेगाव मुंबई १०) हर्षदा परदेशी, वय १९ वर्ष, माहीम,मुंबई ११) अभय विजय साबळे, वय २० वर्ष, मालाड, मुंबई व एका मयताची ओळख पटलेली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.