यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथे दरवर्षाप्रमाणे यंदाही श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाने अखंड नामजप यज्ञ सप्ताहाचे आयोजन येथील शहरातील भुसावळकडे जाणाऱ्या मार्गावरील टेलीफोन ऑफिस जवळील श्री स्वामी समर्थ केंद्रात आयोजित करण्यात आले आहे.
या सप्ताहाच्या कालावधीत पाचवा वेत म्हणून ओळखला जाणाऱ्या श्री गुरुचरित्र या प्रासंगीक ग्रंथाचे पारायण नवनाथ भक्तिसार हवानियुक्त गुरुचरित्र अखंड प्रहरे यामध्ये सकाळी आठ ते रात्री आठ पर्यंत महिला व रात्री आठ ते सकाळी आठ पर्यंत पुरुष सेवेकरी देत आहेत.तसेच श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्रंबकेश्वर येथून आलेल्या नियोजनानुसार श्री गणेशा म्हणून बोधयाग,श्री स्वामी समर्थ याग,श्री चंडीया गीताई याग,रुद्र मल्हार याग,बली पूर्णाहुती,सत्यदत्त पूजन दररोज नित्यसहाकार हद्दचंडी अंतर्गत श्री स्वामी चरित्र सारामृत असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम व ग्रामअभियान प्रशिक्षण असे भरगच्च कार्यक्रम या सप्ताहाच्या कालावधीत होत आहे तसेच १८ एप्रिल रोजी श्री संत दत्त पूजन होऊन सकाळी दहा वाजता सप्ताहाची सांगता महाआरतीने होईल.नंतर माननीय स्वरूपात महाप्रसाद वाटपात यावल शहर सह पंचक्रोशीतील सर्व भाविक तसेच तालुक्यातून सेवेकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.तरी या सेवेचा व शाखा अखंड सात दिवस चालणाऱ्या विनावादन स्वामी समर्थ यांचे पोथी वाचन व मार्गचा भाविक भक्त व सहकारी यांनी लाभ घ्यावा असे आवाहन तालुका प्रमुख विकास चोपडे,बाळू भोगे यांनी केले आहे