सादिक शेख,पोलीस नायक
मोताळा तालुका (प्रतिनिधी):-
येथील पोलीस स्टेशन आवारात “दावते-इफ्तार”पार्टीचे आयोजन पोलीस निरीक्षक सुखदेव भोरकडे व त्यांच्या सहकार्याकडून नुकतेच करण्यात आले.मुस्लिम बांधवांच्या रमजान या पवित्र महिन्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक व रोजेदार मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अत्यंत नियोजनपूर्वक आणि आनंदी वातावरणात “दावते-ए-इफ्तार” हा कार्यक्रम संपन्न झाला.याप्रसंगी जामा मस्जिदचे इमान आदरणीय हनीफ मिल्ली यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना रोजेचे महत्व विशद केले तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक किशोरसेठ मोदे, गजानन घोंगडे,अलीम कुरेशी यांनी रमजान महिना व रोजा या संदर्भात आपले विचार व्यक्त केले.प्रसंगी पोलीस निरीक्षक सुखदेव भोरकडे यांनी गावात शांतता सुव्यवस्था व जातीय सलोखा कायम राहावा व सर्व धर्मियांनी आपआपले सन उत्सव एकीने साजरे करावे असे आवाहन केले तसेच रोजेदारांना अल्पोपहार देऊन रोजा सोडण्यात आले.यावेळी कार्यक्रमाला महिला आघाडी शिवसेना जिल्हाप्रमुख चंदाताई बढे, माजी सरपंच असलम पठाण,दिनकर बढे,उपसरपंच भास्कर हिवाळे,ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण गवई,धनराज भाऊ घोंगडे,ऍड वसीम कुरेशी,प्रतिष्ठित नागरिक नानाभाऊ राजपूत,गणेश सिंग राजपूत,राजू बोरसे,सुरेश शिरसागर,कृष्णा भोरे यांची प्रमुख उपस्थिती राहिली.कार्यक्रम यशस्वितेकरिता धामणगाव बढे पोलीस स्टेशन कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.