Just another WordPress site

येत्या १५ दिवसात महाराष्ट्र व दिल्लीत दोन राजकीय भूकंप होणार?सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याने खळबळ

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा):-
महाराष्ट्रात राजकीय महानाट्याचा दुसरा अंक पाहायला मिळणार का? याच्या चर्चा सध्या जोरदार सुरू आहेत यात राष्ट्रवादीचे अजित पवार हे भाजपाला साथ देणार?असल्याची जोरदार चर्चा राज्यात ऐकायला मिळत आहे याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठा दावा करत म्हटले आहे की,येत्या १५ दिवसात महाराष्ट्र व दिल्लीत दोन राजकीय भूकंप होणार?त्यामुळेच सुप्रिया सुळे यांच्या या दाव्यानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंपाचे अंदाज वर्तवले जात आहेत.सुप्रिया सुळे यांना अजित पवार कुठे आहेत याबाबत विचारणा केली असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की,तुम्ही त्यांच्या मागे जा,तु्म्हाला समजेल ते कुठे आहेत.प्रत्येकाला अनेक समस्या असतात व राज्यात कामे होत नाहीत त्यामुळे काही कार्यक्रम रद्द करून अजित पवार गेले होते.एक कार्यक्रम रद्द केल्याने काही होत नाही असेही सुप्रिया सुळेंनी म्हटले आहे.
अजित पवार भाजपात जाणार का? याबाबत प्रश्न विचारला असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की माझ्याकडे भविष्य वर्तविण्यास वेळ नसून मी एक लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडे खूप कामे आहेत मला याबाबत काहीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.अजितदादा हा मेहनत करणारा माणूस असल्यामुळे त्याच्या विषयी अशा चर्चा होत आहेत असेही सुप्रिया सुळेंनी म्हटले आहे.काही दिवसांपूर्वीच प्रकाश आंबेडकर यांनी देखील पंधरा दिवसात राज्यात राजकीय भूकंप होणार?असे म्हटले होते याविषयी विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या “एक नाही तर दोन राजकीय भूकंप होणार आहेत,यात एक दिल्लीत व दुसरा महाराष्ट्रात”असे उत्तर सुप्रिया सुळे यांनी दिले आहे.सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरणात एकच खळबळ उडाली आहे.तसेच गेल्या काही महिन्यांपासून अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणेही टाळले आहे त्यामुळे अजित पवार भाजपात जातील असा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तविला जात आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.