Just another WordPress site

“जोपर्यंत आमच्या जिवात जीव आहे,तोपर्यंत आम्ही पक्षाचे काम करत राहणार”-अजित पवार यांची स्पष्टोक्ती

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार पक्षात बंडखोरी करणार असल्याची शक्यता आज सकाळपासून वर्तवली जात होती अशात न्यू इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानंतर या चर्चेने जोर धरला होता तसेच यावरून राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लढवले जात होते.परंतु या चर्चेला खुद्द अजित पवार यांनी या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नसल्याची स्पष्टोक्ती करत या घटनेला पूर्णविराम दिला आहे.दिवसभर चर्चा रंगल्यानंतर आज दुपारी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधतांना म्हटले की,यावेळी “जिवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादी पक्षासाठी काम करत राहणार”, असेही ते म्हणाले.राष्ट्रपती पक्षाची स्थापना स्वाभिमानातून झाली आहे व १० जूनला १९९९ पासून आम्ही काम करतोय तसेच आजही आम्ही काम करतोय,उद्याही करत राहणार.जोपर्यंत आमच्या जिवात जीव आहे,तोपर्यंत आम्ही पक्षाचे काम करत राहणार असे म्हणत अजित पवार यांनी आज सर्वच चर्चांना पूर्णविराम दिला आहे.या बातम्या विपर्यास करून दाखवल्या जातात व अशा चर्चा सुरू झाल्याने जवळचे कार्यकर्ते नाराज होतात,संभ्रामवस्थेत जातात परंतु यात काहीही तथ्य नाही प्रत्येकाने आपआपले काम करा,महाविकास आघाडी बळकट होण्याकरता प्रयत्न करा असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

माझ्याबाबत जाणीवपूर्वक वेगवेगळ्या ठिकाणी आरोप करण्यात आले परंतु या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही.नागपूरमध्ये महाविकास आघाडीची सभा असल्याने तिथे गेलो होतो.उद्धव ठाकरे तिथे विमान घेऊन आले होते त्यामुळे त्यांना विनंती करून मी त्यांच्या विमानातून मुंबईत परतलो आहे.दरम्यान महराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचा निर्णय झाला या पुरस्कार सोहळ्यात श्री सदस्यांना त्रास झाला तर काहीजण बेशुद्ध झाले.उष्माघातामुळे काहींचा जीव गेला.एवढे मोठे संकट मोठ्या प्रमाणावर येते त्यावेळी त्यांना आधार देण्याची संस्कृती आहे. वास्तविक जी संवेदनशीलता सरकारने दाखवायला पाहिजे तिथे सरकार कमी पडले त्यामुळे निष्पाप लोकांचा बळी गेला म्हणून मी पनवेलच्या रुग्णालयात गेलो होतो.विरोधी पक्षनेता असल्याने तिथे जाणे गरजेचे होते असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.तसेच अजित पवार यांच्याकडे ४० आमदारांच्या सह्यांचे पत्रक तयार असल्याचे तसेच हे आमदार अजित पवारांसोबत बैठक घेत असल्याचेही बोलले जात होते यावरून अजित पवारांनी स्पष्टीकरण देतांना म्हटले आहे की,अनेक आमदार मंत्रालयात येत असतात.आजही मी येथे असल्याने आमदार मला येथे भेटायला आले व ही नेहमीचीच पद्धत आहे त्यात वेगळा अर्थ काढू नका.त्यांची वेगवेगळी कामे घेऊन आले होते माझेही त्यांच्याकडे काम होते परंतु अशा अफवांमुळे जो पक्षाचा कणा आहे तो संभ्रावस्थेत जातो.काही काळजी करू नका.आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाली आहे यात पक्षात अनेक चढउतार आले.ज्या काही बातम्या पसरवल्या जात आहेत त्या जाणीपूर्वक पसरवल्या जात असून महत्त्वाच्या प्रश्नांवरून लक्ष विचलीत करण्याकरता,बेरोजगारी,अवकाळी पाऊस,पंचनामे न होणे या मुद्द्यांवरून हे लक्ष विचलीत करण्याकरता अशा अफवा उठवल्या जात असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.