Just another WordPress site

“अमित शाह,एकनाथ शिंदे व फडणवीस यांनी तेरा लोकांची हत्या केली”

एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांची खरमरीत टीका

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा):-
महाराष्ट्र सरकारने अलीकडेच आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार दिला.या पुरस्कार सोहळ्याला लाखो लोक उपस्थित होते.सदरील कार्यक्रमस्थळी लोकांना भरउन्हात तब्बल तीन तास बसावे लागले त्यामुळे १३ लोकांचा उष्माघाताने मृत्यू झाला.या पार्श्वभूमीवर एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करीत संबंधित तिघांनी १३ लोकांची हत्या केली असल्याचे म्हणत या तिन्ही नेत्यांवर खरमरीत टीका केली आहे.महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या कार्यक्रमात घडलेल्या उष्माघात प्रकरणावर भाष्य करताना इम्तियाज जलील म्हणाले की,आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे काम खूप मोठे आहे त्यामुळे त्यांना ‘महाराष्ट्र भूषण’पुरस्कार देण्यात आला त्यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो परंतु हा पुरस्कार देण्यासाठी जो कार्यक्रम घेण्यात आला त्या कार्यक्रमाला धर्माधिकारी यांचे २० लाख अनुयायी बोलवण्यात आले होते व त्यांच्या मतांसाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता तसेच या कार्यक्रमाकरीत तब्बल १४ कोटी रुपये खर्च करण्यात आले असल्याचे मला सांगण्यात आले आहे.
या कार्यक्रमात स्वत:ला घाम येऊ नये म्हणून अमित शाह,एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस हे शेडमध्ये बसले होते परंतु लाखोंच्या संख्येने  उपस्थित राहणाऱ्या गोर-गरीब अनुयायांना तुम्ही उन्हात बसवले यामध्ये १३ लोकांचा बळी गेला असून हा बळी गेला नाही तर त्यांची हत्या झाली आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शाह,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी या हत्या केल्या असे गंभीर विधान इम्तियाज जलील यांनी ‘साम टीव्ही’शी बोलत असतांना केले आहे.त्यांनी आपली जबाबदारी खूप चांगल्या पद्धतीने पार पाडली.तुम्ही गरीब लोक आहात,तुम्ही मेलात तर काय फरक पडणार नाही.आम्ही तुम्हाला सरकारी तिजोरीतून पाच लाख रुपये देतो.पण तुम्हाला लाज वाटायला हवी.माणसाची किंमत तुम्ही पाच लाख रुपये इतकी केली.तुम्हाला थोडीतरी लज्जा असेल तर पीडित कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाख रुपये मदत करा.आपल्या राजकीय स्वार्थासाठी तुम्ही लोकांचा बळी घेतला.यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा होता.हीच घटना परदेशात घडली असती तर व्यासपीठावर बसलेल्या तिन्ही जणांना राजीनामा द्यावा लागला असता परंतु तुम्ही राजीनामा देणार नाहीत अशी टीका इम्तियाज जलील यांनी केली आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.