Just another WordPress site

बोरावल खुर्द विकासो चेअरमनपदी शशिकला चौधरी व व्हाईस चेअरमनपदी भगवान कोळी बिनविरोध

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-

तालुक्यातील बोरावल खुर्द येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी शशिकला समाधान चौधरी तर व्हाईस चेअरमनपदी भगवान भागवत कोळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.सोमवारी निवडणूक निर्णय अधिकारी एम.व्ही.महाजन यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली आहे.

यावल तालुक्यातील बोरावल खुर्द,बोरावल बुद्रुक,टाकरखेडा,भालशिव,पिंप्री व टेंभी कुरन कार्यक्षेत्र असलेल्या येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या निवडीसाठी सोमवारी सोसायटीचे सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी एम. व्ही.महाजन यांचे अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीत सोसायटीच्या चेअरमनपदी शशिकला चौधरी तर व्हाइस चेअरमनपदी भगवान कोळी यांची यावेळी बिनविरोध निवड करण्यात आली.या बैठकीस सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक तथा यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील,गुरूदास पाटील,संतोष पाटील,कमलाकर सपकाळे,समाधान पाटील,यशवंत चौधरी,कुलदिप पाटील,संजय महाजन,अंजनाबाई पाटील,रतन कोळी,शरद चौधरी उपस्थित होते.यावेळी निवड करण्यात आलेल्या चेअरमन शशिकला चौधरी व व्हाइस चेअरमन भगवान कोळी यांचा उपस्थित संचालक मंडळाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.