Just another WordPress site

भाजप नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका ट्विटने पुन्हा एकदा खळबळ

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा):-

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आलेला दिसून येत आहे तसेच राज्यातील सत्तासंघर्षावरील निकाल कधीही जाहीर होऊ शकतो परंतु तत्पूर्वी राष्ट्र्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असा वावड्या उठवण्यात आल्या होत्या. अजित पवारांनी स्वतः पत्रकार परिषद घेत या बातम्या फेटाळून लावत असतानाच आता भाजप नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका ट्विटने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.यात देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर हॅन्डल वरून दोन फोटो शेअर केले असून या फोटोमध्ये ते कार्यालयीन कामकाज करतांना दिसून येत आहेत.मिशन नो पेंडेन्सी असा हॅशटॅग त्यांनी यावेळी दिला आहे.”Office work.Clearing pendencies.. कार्यालयीन कामकाज..”असे त्यांनी ट्विटरद्वारे म्हटले आहे.फडणवीसांच्या टेबलावर ढीगभर फायली सुद्धा दिसत असून या फायलींवर फडणवीस सह्या करत आहेत.फडणवीस सर्व पेंडिंग काम पूर्ण करत असल्याने ट्विट शेअर केल्याने चर्चांना नवीन उधाण आले आहे.

राज्यातील सत्तासंघर्षवरील निकाल कधीही समोर येऊ शकतो सदरील निकाल हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह काही आमदार भाजपसोबत जाणार अशा वावड्याही गेल्या काही दिवसांपासून उठत आहेत मात्र आपण भाजपसोबत जाणार नाही असे अजित पवार यांनी आधीच स्पष्ट केले आहे.अजित पवार यांच्या  स्पष्टीकरणानंतर काही तासांतच फडणवीसांनी पेंडिंग कामे पूर्ण करत असल्याचे ट्विट केले आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्यातील सरकार टिकणार कि जाणार?अशा चर्चाना उधाण आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.