जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी):-
येथे भीम जयंती रौप्य महोत्सवी वर्ष २०२३ व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्ताने दि.२३ एप्रिल २३ रविवार रोजी सायंकाळी ६.३० वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,छत्रपती संभाजी नगर,महाबळ जळगाव येथे शाहीर सपनाताई खरात यांच्या सुमधुर आवाजातील”वंदन तुला भीमराया”कृत भीम गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी जिल्ह्यातील समस्त जनतेने परिवारासह उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी तसेच भीम गीतांच्या श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक भीम जयंती उत्सव समिती छत्रपती संभाजी नगर जळगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.