Just another WordPress site

शिवसेनेचा दसरा मळावा शिवतीर्थावरच होणार;शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची माहिती

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-शिवसेनेचा दसरा मेळावा हा नेहमीप्रमाणे शिवतीर्थावरच होणार असल्याने याबाबत कोणीही कोणताही संभ्रम मनात बाळगू नये.त्याचबरोबर शिवसैनिकांनी कामाला लागण्याचे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.आज मातोश्री बंगल्यावर शिवसेना पदाधिकारी व विभागप्रमुख याच्यासोबत झालेल्या बैठकीदरम्यान बोलतांना यांनी हि माहिती दिली.

या वर्षी होणारा दसरा मेळावा हा नेहमीप्रमाणे शिवतीर्थावरच होणार याबाबत कसलीही शंका नाही त्यामुळे राज्यातील शिवसैनिकांनी कामाला लागावे व दसरा मेळाव्यास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विभागप्रमुख,उपविभागप्रमुख व पदाधिकारी यांना दिले आहेत.दसरा मेळावा शिवतीर्थावर होणेबाबतचा रिमाइंडर अर्ज मुंबई महापालिकेला देण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना दिली.वेदांत फॉक्सकॉन प्रकल्पावरून उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली.वेदांत प्रकल्प महाराष्ट्रात आणण्याकरिता आघाडी सरकारच्या काळात आम्ही खुप प्रयत्न केले.मात्र आता हा प्रकल्प गुजरातमध्ये जात असतांना आताचे राज्य सरकार काय करत होते असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.तसेच शिवसेना फोडण्याचे काही जणांकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहे.शिवसेना फोडण्याआधी फोडणाऱ्यांनी आधी इतिहास जाणून घ्यावा असेही  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.