यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील शहरालगत असलेल्या श्री महर्षी व्यास महाराज मंदीराच्या मागे असलेल्या आदिवासी झोपटपट्टीतुन आईजवळ असलेल्या एक ते दिड वर्षाच्या बालकास हिंस्त्र प्राणी लांडग्याने हल्ला करीत पळवुन घेऊन जाण्याच्या तयारीत असतांना या हल्ल्यात बालकाला त्या लांडग्याच्या तावडीतुन सोडवणारा तरुण हा लांडग्यासोबत झालेल्या झटापटीत गंभीर जखमी झाला असुन हिंस्त्र लांडगा मात्र या झटापटीत मरण पावला आहे.जखमी तरूणावर प्रथमोपचार केल्यानंतर जळगाव येथे पाठविण्यात आले असुन बालक व त्या तरूणावर उपचार सुरू असुन त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे वृत्त आहे.
याबाबत मिळालेली माहीती अशी की,यावल शहरालगल असलेले श्री व्यास महाराज यांचे मंदिर असुन मंदीराच्या बाजुस असलेल्या स्मशानभुमीच्या रस्त्यावर काही आदीवासी नागरिकांची झोपडपट्टी आहे.त्या ठिकाणी दि.१७ एप्रील सोमवार रोजी गोलु भिल नावाचा दिड वर्षाचा बालक आपल्या आईजवळ असतांना त्या ठीकाणी अचानक लांडग्याने हल्ला केला व महिलेजवळ असलेले बालक पळवले असता त्या बालकाची लांडग्याच्या तावडीतुन सुटका करण्यासाठी योगेस अनिल भिल वय २१ वर्ष या तरूणाने धाडस दाखवुन त्या हिंस्त्र लांडग्याचा पाठलाग करून त्याच्या तावडीतुन बालकाची सुटका केली.यावेळी बालकाचे प्राण वाचविण्याच्या प्रयत्नात असतांना त्या हिंस्त्र लांडग्याच्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असुन यात हिंस्त्र प्राणी लांडगा हा मारला गेला आहे.या हल्ल्यात जखमी अनिल भिल या तरुणावर प्रथम यावलच्या ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले नंतर प्रकृती गंभीर झाल्याने त्यास तात्काळ जळगाव येथे हलविण्यात आले आहे. यावेळी घटनेवृत्त कळताच घटनास्थळी यावल पुर्व वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रम पदमोर व त्यांचे सहकारी तसेच अभयारण्य विभाग क्षेत्राचे चौहाण हे उपास्थित होते.यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रम पदमोर यांनी त्या तरुणावर उपचारासाठी आपल्यापरीने तात्पुरती आर्थिक मदत दिली आहे.