Just another WordPress site

‘राजर्षी शाहू महाराज परदेशी शिक्षण’शिष्यवृत्ती पुन्हा सुरु;सुप्रिया सुळे यांनी मानले राज्य सरकारचे आभार

पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-

परदेशात शिक्षण घेत असलेल्या काही विद्यार्थ्यांना एटीकेटी गुण मिळल्याने ‘राजर्षी शाहू महाराज’ परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचा लाभ सरकारच्या वतीने थांबवण्यात आला होता याबाबतची माहिती मिळताच खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा केल्यामुळे  याला आता राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला असून ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना पुन्हा सुरु करण्यात आली असल्याचे सरकारच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांसाठी ‘राजर्षी शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती’ही योजना राबविण्यात येते यामध्ये परदेशातील विद्यार्थ्यांची शिक्षण पूर्ण फी,आरोग्य विमा व व्हिसा शुल्क मिळत असते सदरहू या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे परंतु अनेकदा नवे वातावरण व अन्य काही कारणांमुळे मुलांना एटीकेटी गुण मिळतात त्यांनतर त्यांची शिष्यवृत्ती ही थांबवण्यात येत असते.

तरी या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊन परदेशात शिकत असणाऱ्या काही विद्यार्थ्यांना एटीकेटी गुण मिळाल्याने त्यांची शिष्यवृत्ती थांबवली होती त्यामुळे त्यांना तेथे मोठा त्रास सहन करावा लागत होता याबाबत राज्य सरकारकडे विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती पुर्ववत करण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी पाठपुरावा केला होता.त्यानंतर आता राज्य सरकारने ही शिष्यवृत्ती पुन्हा सुरु करण्यात आली आहे.या शासनाच्या निर्णयाबद्दल सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले असून ही अतिशय आनंदाची बाब आहे यामुळे सदर विद्यार्थ्यांचे शिक्षण आता पुन्हा व्यवस्थित होऊ शकेल असा विश्वास सुप्रिया सुळेंनी ट्विट करत व्यक्त केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.