गोपाल शर्मा ,पोलीस नायक
अमरावती जिल्हा प्रमुख
येथील भगवान परशुराम जन्मोत्सव शोभायात्रा समितीच्या वतीने आज दि.२२ एप्रिल २३ शनिवार रोजी भगवान परशुराम जन्मोत्सवा निमित्ताने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आयोजक सूरज मिश्रा यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत दिली आहे.
अमरावती येथे दरवर्षानुसार यावर्षीही अक्षय तृतीयाच्या पावन पर्वावर भगवान श्री परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्ताने आज दि.२२ एप्रिल २३ रोजी संध्याकाळी ५ वाजता अमरावती शहरामध्ये भगवान श्री परशुराम जन्मोत्सव शोभायात्राचे भव्य दिव्य असे आयोजन करण्यात आले आहे.अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ व सर्वशाखीय तसेच सर्व भाषीय ब्राह्मण संघटना यांच्याद्वारा आयोजित करण्यात आलेल्या या शोभायात्रेमध्ये सर्व हिंदू समाज बांधवांची उपस्थिती राहणार आहे.यावेळी सायंकाळी ४.३० वाजता भगवान श्री परशुरामजी यांच्या प्रतिमेचे पूजन व आरती करण्यात येईल.आरती व पूजन केल्यानंतर भगवान श्री परशुरामजी यांच्या प्रतिमेला शोभायात्रामध्ये समाविष्ट करून सुसज्जित अशा रथामध्ये बसविल्यानंतर ही शोभायात्रा सिताराम बाबा मंदिर मैदान पासून निघून राजापेठ,राजकमल,श्याम चौक,जयस्तंभ चौक,जवहार गेट,साबणपुरा पोलीस चौकी जवळून गांधी चौकला पोहोचणार असून तेथे श्री गजानन महाराज मंदिर परिसरात या शोभायात्रेचे विधी विधान पूर्वक समापन करण्यात येणार आहे.यावर्षी या शोभायात्रेमध्ये विविध धार्मिक व सामाजिक संदेश देणाऱ्या विविध देखाव्यांचा समावेश हा महिला मंडळ व समाजातील लहान बालगोपालांच्या माध्यमातून सादर करण्यात येणार आहे.यासोबतच शोभायात्रेमध्ये डीजे,ढोल पथक,संदल व बँजो पार्टी सहित अश्वपथकाचाहि समावेश असणार आहे.
या प्रसंगी अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीतजी राणा,राज्यसभा खासदार डॉ.अनिलजी बोंडे, आमदार सुलभाजी खोडके,आमदार रविभाऊ राणा,माजी पालकमंत्री व विधान परिषद सदस्य प्रवीण पोटे,माजी मंत्री डॉ.सुनील देशमुख,माजी खासदार अनंत गुढे,शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी,सार्वजनिक लोकनिर्माण विभागचे मुख्य अभियंता गिरीश जोशी,राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके,माजी महापौर विलास इंगोले,काँग्रेस शहराध्यक्ष बबलू शेखावत व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अरुण पडोले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.तर कार्यक्रम यशस्वितेकरिता संयोजक सुरज मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली संयोजक समिती,स्वागत व जनसंपर्क समिती,नवरत्न समिती,शोभायात्रा व्यवस्थापन समिती,सुरक्षा समिती,पूजा विधि समिती,भोजन समिती,साऊंड मंडप डेकोरेशन समिती,प्रचार व प्रसार समितीचे गठन करण्यात आले असून त्यामध्ये विविध समाज बांधवांचा समावेश करण्यात आला आहे.या शोभायात्रेदरम्यान आकर्षक देखावा सादर करणाऱ्या स्पर्धकांना आकर्षक बक्षीस दिले जाणार असून आयोजन समिती व परीक्षण मंडळाद्वारे परीक्षण करण्यात येणार आहे.यात उत्कृष्ट देखावा सादर करणाऱ्यास सुरज मिश्रा यांच्याकडून प्रथम पुरस्कार ५००१ रुपये,हिमांशू तिवारी यांच्याकडून द्वितीय पुरस्कार ४००१ रुपये,सारिका मिश्रा यांच्याकडून तृतीय पुरस्कार ३००१ रुपये,निशी चौबे यांच्याकडून चतुर्थ पुरस्कार २००१ रुपये, व पराग चिमोटे यांच्याकडून पाचवा पुरस्कार १००१ तसेच या शोभायात्रेमध्ये समाविष्ट सर्व देखाव्यांना प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात येणार आहे.कार्यक्रम यशस्वितेकरिता अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ,अखिल भारतीय ब्राह्मण महिला आघाडी,युवक आघाडी तसेच ब्राह्मण समाज शाखा पदाधिकारी व समस्त समाज बांधव यांचे सहकार्य लाभणार आहे.तरी भगवान श्री परशुराम जन्मोत्सवा निमित्ताने आयोजित शोभायात्रेचा समस्त हिंदू समाज बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन भगवान परशुराम जन्मोत्सव शोभायात्रा समिती संयोजक सुरज अनिल मिश्रा यांनी केले आहे.