Just another WordPress site

धरणगाव बाजार समिती प्रचारपत्रक व फलकावर शिंदे व फडणवीस यांच्यासोबत अजित पवारांचा फोटो

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी):-
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना त्यांनी स्वत:च पूर्णविराम दिल्यानंतरही आता जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत धरणगावला शिवसेना-भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट मैदानात उतरला आहे.या प्रचारपत्रकासह फलकावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर विरोधी पक्षनेते अजित पवार यांचाही फोटो असल्याने जळगाव जिल्ह्यात हे फलक चर्चेचा विषय बनले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये धरणगाव वगळता इतर ठिकाणी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप-शिंदे गट असा सामना होत आहे मात्र धरणगाव बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप-शिंदे गटासोबत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी युती करून सहकार पॅनल रिंगणात उतरविले आहे.या पॅनलच्या प्रचारासाठी तयार करण्यात आलेल्या फलकावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचाही फोटो झळकत आहे.राष्ट्रवादीचे संजय पवार यांनी शिवसेना-भाजपसोबत युती करून बाजार समितीत उमेदवार उभे केले आहेत तसेच याआधीही दूध संघ व जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पवारांनी शिवसेना-भाजपला साथ दिली होती.धरणगाव बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा राष्ट्रवादीतील गटबाजी पाहायला मिळत आहे त्यामुळे अर्धी राष्ट्रवादी आमच्यासोबत आहे असे विधान मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.शेतकरी टिकेल तर शेत पिकेल असे म्हणत शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी सहकार पॅनल या निवडणुकीत उभे करण्यात आले आहे.अशात बाळासाहेब ठाकरे,पंतप्रधान नरेंद्र मोदी,एकनाथ शिंदे,देवेंद्र फडणवीस, अजित पवार,मंत्री गिरीश महाजन,मंत्री गुलाबराव पाटील यांचे फोटो एकाच फलकावर असल्याने राजकीय चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.