Just another WordPress site

सरकारचे ‘डेथ वॉरंट’ तयार असून फक्त सही बाकी असल्याने १५ दिवसांमध्ये हे सरकार कोसळणार-संजय राऊत यांचे भाकीत

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी):-

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचे “डेथ वॉरंट” तयार झाले असून आता फक्त त्यावर कोण व कधी सही करणार? हे ठरणे बाकी आहे त्यामुळे येत्या १५ दिवसांमध्ये हे सरकार कोसळेल असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे ते आज दि.२३ एप्रिल रविवार रोजी जळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात आज ठाकरे गटाची महासभा असून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या सभेला संबोधित करणार आहेत.सदरील सभेची संपूर्ण तयारी झाली असून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत दोन दिवसांपासून जळगावात असून सभेच्या तयारीचा आढावा घेत आहेत.

आजच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावरही निशाणा साधला.आमच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत असे विखे-पाटील यांनी म्हटले होते त्यावरुन संजय राऊत यांनी विखे-पाटलांचा समाचार घेतला.लग्न एकाबरोबर आणि संसार दुसऱ्या बरोबर करणे योग्य नाही.तुमच्या मनात कोणी असेल अन तुम्ही दुसऱ्याबरोबर नांदताय हा तर व्यभिचार आहे.देवेंद्र फडणवीस हे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मनातील मुख्यमंत्री असतील तर त्यांनी फडणवीसांच्या गळ्यात मंगळसूत्र बांधावे त्यांच्या मनात दुसरे मुख्यमंत्री असतील तर त्यांनी त्यांना बसवा असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.विखे पाटलांनी खूप वेळा कन्फ्यूज केले आहे.याआधी ते काँग्रेस पक्षात होते मग ते शिवसेनेत आले.शिवसेनेत असतांना मंत्रीपद उपभोगली त्यानंतर दुसऱ्या मग तिसऱ्या पक्षात गेले त्यांच्या भूमिकांमध्ये गोंधळ आहे. उद्या राज्यात सत्तापालट झाल्यास राधाकृष्ण विखे-पाटील आणखी एखाद्या पक्षात जातील असे संजय राऊत यांनी म्हटले.सुवर्णनगरीतले काही दगड आमच्या सोबत होते मात्र ते दगडच निघाले अशी टीका संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर केली.कोरोना काळात लोकांचे प्राण जात असताना जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री गुलाबराव पाटील यांनी ४०० कोटी रुपयाचा घोटाळा केला आहे.त्याची कागदपत्रे  माझ्याजवळ आहेत.विधानसभेत व विधान परिषदेत याबद्दल प्रश्न उपस्थित झाले मात्र हे प्रकरण दाबण्यात आले असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.यावेळी संजय राऊत यांनी पु्न्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकार पडणार असल्याचे भाकीत केले.सर्व सरकारच भ्रष्ट आहे त्यामुळे पुढच्या पंधरा दिवसात हे सरकार कोसळेल ? सरकारचे डेथ वॉरंट तयार आहे त्यावर फक्त सही व्हायची बाकी आहे,पुष्पचक्र अर्पण करा असे म्हणत संजय राऊत यांनी भाजप शिंदे गट युतीतील सरकारवर निशाणा साधला आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.