पाचोरा-पोलीस नायक (प्रतिनिधी):-
आर.ओ.तात्या हे जमिनीशी जुडलेले नेते असून त्यांचा वारसा वैशालीताई समर्थपणे पुढे नेत असल्याचे कौतुकोदगार माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काढले आहे ते आज दि.२३ रोजी तात्यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमात बोलत होते.आज सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास उध्दव ठाकरे यांचे पाचोरा शहरात आगमन झाल्यानंतर त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आले प्रसंगी कार्यकर्त्यांनी शहरातून मोटारसायकल रॅली काढली यावेळी कार्यकर्त्यांचा उत्साह मावेनासा झाला होता.
यावेळी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते आज दि.२३ रोजी निर्मल सीडस कंपनीच्या परिसरात उभारण्यात आलेल्या दिवंगत माजी आमदार आर.ओ.तात्या पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.याप्रसंगी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत,जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.याप्रसंगी उध्दव ठाकरे यांनी तात्यांच्या आठवणींना उजाळा दिला तसेच आपल्याला शेतकर्यांसाठी खूप काही करायचे असल्याचे सांगितले.केंद्र व राज्य सरकार शेतकर्यांच्या विरोधात असल्याची टिका त्यांनी यावेळी केली.तसेच वैशालीताई सूर्यवंशी या तात्यांचा वारसा समर्थपर्थणे पुढे नेण्याचे कार्य करीत असल्याचे सांगत उद्धव ठाकरे त्यांच्याकडून वैशालीताई सूर्यवंशी यांचे कौतुक करण्यात आले आहे.दरम्यान पुतळा अनावरण झाल्यानंतर उध्दव ठाकरे
यांच्या उपस्थितीत पाचोरा येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे.