Just another WordPress site

बुलढाण्यातील ‘भेंडवळची घटमांडणी’चे भाकित जाहीर

संतोष थोरात,पोलीस नायक

संग्रामपूर तालुका (प्रतिनिधी) :-

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या बुलढाण्यातील ‘भेंडवळची घटमांडणी’चे भाकित नुकतेच जाहीर करण्यात आले आहे.गेल्या ३५० वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला याठिकाणी देशातील पाऊस पाणी,अर्थव्यवस्था,राजकीय घडामोडी यावर भाकिते केली जातात त्यामुळे या घटमांडणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून होते.यावेळी सुद्धा भेंडवळच्या घटमांडणीने अनेक भाकिते केली असून यंदाच्या भाकितानुसार पाऊस चांगला होणार आहे तसेच यावर्षी पिके देखील चांगली येण्याची भविष्यवाणीही वर्तवण्यात आली आहे.

चंद्रभान महाराज यांचे वंशज पुंजाजी महाराज व सारंगधर महाराज यांनी निरीक्षणे करून यंदाचे भाकीत अंदाज जाहीर केले आहे.या भाकितानुसार यंदा पाऊस चांगला असेल तर जुलै व ऑगस्टमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडून अतिवृष्टी होईल असे भाकीत वर्तवण्यात आले आहे.तसेच सप्टेंबर महिन्यात पाऊस थोडा कमी असेल परंतु अवकाळी पाऊस मात्र भरपूर होणार असून पिकांचे नुकसान होईल असे या भाकितात म्हटले आहे.यावेळी पीक पाण्यासंबंधीचे अंदाज सुद्धा वर्तवण्यात आले असून यंदा पिकांवर रोगराई येईल,ज्वारी सर्वसाधारण राहिल,तूर पीक चांगले असेल,मूग,उडीद,तीळ,बाजरी पीक सर्वसाधारण असेल मात्र नासाडी होईल.तांदुळाचे चांगले पीक येईल तसेच गव्हाचे सर्वसाधारण बाजार भाव तेजीत राहतील.देशातील राजकीय परिस्थितीवर सुद्धा भेंडवळच्या घटमांडणीने भाकीत केले आहे.देशाचा राजा कायम आहे परंतु राजा कायम तणावात असेल त्याला अडचणींचा सामना करावा लागेल असे भाकीत वर्तवण्यात आलेले आहे.राजकीय उलथापालथी या होतच राहतील,देशाच्या आर्थिक परिस्थितीत चढ उतार पहायला मिळतील परंतु शेजारील राष्ट्रे कायम कुरघोड्या करत राहतील अशीही भविष्यवाणी करण्यात आली आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.