निपाणे घटनेच्या निषेधार्थ रिपाई तर्फे कासोदा पोलीस निरीक्षकांना निवेदन
गुन्ह्यातील आरोपीला तात्काळ अटक न झाल्यास आंदोलनाचा इशारा
कासोदा-पोलीस नायक(प्रतिनिधी):- पाचोरा तालुक्यातील निपाणे येथील बौद्ध समाज्याच्या वयोवृद्ध महिलेचा सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यास मज्जाव करणाऱ्या जातीयवादी गावगुंड यांच्यावर दाखल झालेल्या अट्रासिटी कायद्यासह इतर कलमांखाली गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करून कार्यवाही करावी अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एरंडोल तालुका शाखेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल अशा आशयाचे निवेदन कासोदा पोलीस निरीक्षक नीता कायटे यांना देण्यात आले.
छत्रपती राजर्षी शाहु महाराज,महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणाऱ्या महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटना घडणे हि बाब फारच निंदनीय व दुर्दैवी आहे.अशा या घटनेचा सर्व समाजाच्या माध्यमातून जाहीर निषेध केला जात आहे.अशा या समाजविघातक प्रवृत्तीच्या जातीयवाद्यांना पोलिसांनी तात्काळ अटक करावी अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एरंडोल तालुका शाखेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल व होणाऱ्या परिणामास संबंधित प्रशासन जबाबदार राहील असा इशारा तालुका अध्यक्ष प्रवीण बाविस्कर यांनी दिला आहे.निवेदनावर महेंद्र मोरे,जितेंद्र वाघ,मन्सूर पठाण,सतीश सोनवणे,राहुल पानपाटील,अब्दुल कादर रियाजुद्दीन सलाउद्दीन ,शेख बिलाल,अक्षय पानपाटील,भाऊसाहेब पानपाटील,विजय मोरे,शमशुद्दीन शेख नजबुद्दीन यावेळी उपस्थित होते.