Just another WordPress site

“झोळी लटकवून निघून जाशील पण माझ्या जनतेच्या हातात भिकेचा कटोरा देऊन जाशील त्याचे काय करायचे ?”

उद्धव ठाकरे यांच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जोरदार प्रतिउत्तर

 

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जळगावमधील पाचोरा येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली होती.यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की,ते म्हणतात ना,मी फकीर आहे मग झोळी लटकवून निघून जाशील पण माझ्या जनतेच्या हातात भिकेचा कटोरा देऊन जाशील त्याचे काय करायचे ? पंतप्रधानांवरील या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,सदरील वक्तव्य दुर्दैवी असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे नेतृत्व संपूर्ण जगात सिद्ध केले आहे.आपली अर्थव्यवस्था मोठ्या उंचीवर नेली आहे त्यामुळेच आपल्याला जी २० परिषदेचे अध्यक्षपद मिळाले आहे.उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख केला त्याचा निषेध करावा तितका कमी आहे.पंतप्रधानांच्या मातोश्रींचे निधन झाले तेव्हादेखील त्यांनी देशाला प्राधान्य दिले त्यांनी त्यांची राष्ट्रभक्ती सिद्ध केली आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले की,उद्धव ठाकरेंचे हे वक्तव्य वैयक्तिक द्वेशातून आहे.लोकप्रियतेची पोटदुखी निर्माण झाल्यावर अशा प्रकराचे वक्तव्य करण्याचे पाप काही लोक करतात.२५ वर्ष त्यांनी युतीत काम केले असून आता त्याच भाजपा नेत्याबाबत असे वक्तव्य हे निंदाजनक असून त्यांचे वक्तव्य ही बाळासाहेब ठाकरे यांची संस्कृती होऊ शकत नाही.सत्तेसाठी,खुर्चीसाठी व मुख्यमंत्रीपदासाठी ते काय करू शकतात हे आधीच त्यांनी दाखवले आहे व त्याचीच पुनरावृत्ती ते करत आहेत असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.