Just another WordPress site

डांभुर्णी येथील दिव्यांक सोनवणे गुणवंत अधिकारी पुरस्काराने सन्मानित

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-

तालुक्यातील डांभुर्णी येथील रहिवासी तसेच शैक्षणिक व सामाजीक क्षेत्रात समाजहिताचे उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या स्वयंदीप प्रतिष्ठानचे सदस्य व  नाशिक येथे नगरचनाकारपदी प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले दिव्यांक हिरोजीराव सोनवणे यांना महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाच्या वतीने देण्यात येणारा स्वराज्य अभियंता हिरोजी इंदुलकर पुरस्कार २०२३ याकरिता निवड करण्यात आली.

दिव्यांक सोनवणे यांची शासनाच्या वतीने पहिला गुणवंत अधिकारी,अभियंता म्हणून निवड झाल्याबद्दल समस्त सोनवणे परिवार व स्वयंदीप परिवारासाठी हि मोठी अभिमानाची बाब असल्याचे आप्तस्वकियांमध्ये बोलले जात आहे.सदरील पुरस्कार वितरण सोहळा नॅशनल सेन्टर फॉर परफार्मिग आर्ट,नरिमन पॉइंट मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.दिव्यांक सोनवणे हे आजोबा स्व.अण्णा साहेब भीमराव सोनवणे यांचा प्रशासकीय क्षेत्रातील वारसा यशस्वी पद्धतीने व आपल्या प्रामाणिक प्रयत्नांनी जपत असल्याचा सार्थ अभिमान डांभुर्णीकरांनी व्यक्त केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.