Just another WordPress site

यावल बाजार समिती निवडणूकीसाठी २८ एप्रिल रोजी मतदान तर ३० एप्रिल रोजी मतमोजणी

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-

संपुर्ण तालुक्याचे लक्ष वेधणाऱ्या येथील यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या २८ एप्रिल २३ शुक्रवार रोजी होत असलेल्या पंचवार्षीक निवडणुकीच्या मतदानासाठी यावलसह साखळी व फैजपूर येथे मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आलेली असून यानिमित्त झालेल्या मतदानाची मतमोजणी ३० एप्रिल २३ रोजी पंचायत समिती सभागृह,यावल येथे सकाळी दहा वाजेपासून मतमोजणी सुरू होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा विशेष लेखा परीक्षक पी.एफ.चव्हाण यांनी नुकतीच दिली आहे.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षीक निवडणुकीच्या एक १८ संचालक निवडीसाठी मतदान २८ एप्रिल २३ रोजी सकाळी आठ ते चार वाजेपर्यंत राहणार असून याकरिता यावल शहरात शशिकांत सखाराम चौधरी कन्या विद्यालय,तर तालुक्यातील साकळी येथे जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा व फैजपूर येथे म्युनिसिपल हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज असे तीन मतदान केंद्र असणार आहे.यावलसह साकळी व फैजपूर येथे सहकारी संस्था मतदार संघ व ग्रामपंचायत मतदार संघातील मतदार मतदान करतील तर व्यापारी व हमाल तोलारी मतदारसंघाचे मतदारांसाठी यावल येथेच मतदान करता येणार आहे.यावल तालुक्यातील ४९ सेवा सहकारी संस्था व ६७ ग्रामपंचायतचे मतदार संख्या मतदार संघ निहाय पुढीलप्रमाणे विभागले गेले आहेत.यावल-येथे सेवा सहकारी संस्था २१ तर ३० ग्रामपंचायत,फैजपूर-येथे १३ सेवा सह.संस्था तर २० गरमपंचायत,साकळी-येथे १५ सेवा सहकारी संस्था तर १७ ग्रामपंचायत अशा ४९ सेवा संस्था व ६७ ग्रामपंचायतीचे मतदार या मतदान केंद्रावर मतदान करतील.मतदार संघ निहाय असलेले मतदार पुढील प्रमाणे :-सेवा सहकारी संस्था ६०४,ग्रामपंचायत मतदार संघ ६६७,व्यापारी मतदार संघ ३३३,हमाल तोलारी मतदार संघासाठी १००८ असे एकूण २६१२ मतदार आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पी.एफ.चव्हाण यांनी दिली आहे.यावल तालुक्यात महाविकास आघाडी व भाजप सेनेसाठी अत्यंत प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या या निवडणुकीसाठी शेतकरी विकास पँनल व सहकार पॅनल यांच्यावतीने जोरदार मोर्चेबांधणी केली जात असून आमच्याच पक्षाला बहुमत मिळेल असा दावा आघाडी व युतीच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.