Just another WordPress site

शरद पवार व प्रकाश आंबेडकर यांची महाविकास आघाडीसाठीची भेट सकारात्मक : काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा):-

राज्यघटना आणि लोकशाही वाचवण्यासाठी सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे त्यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट महाविकास आघाडीसाठी सकारात्मक ठरली आहे असे काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी नुकतेच सांगितले आहे.वंचित बहुजन आघाडीच्या महाविकास आघाडीतील प्रवेशाबाबत काँग्रेसचा विरोध नाही असेही त्यांनी सांगितले आहे.प्रकाश आंबेडकर व शरद पवार यांची नुकतीच कर्नाटक विधानसभा निवडणुकीसंदर्भात ही भेट झाली होती.वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीमधील प्रवेशाबाबत ही बैठक नव्हती असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले होते.या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी या दोन नेत्यांची भेट महाविकास आघाडीच्या दृष्टीने सकारात्मक असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.