मलाही एक पत्र आले होते त्यामुळे मला फार वाईट दिवस काढावे लागले.मला आता लक्षात आले आहे की,बोलण्याचा उपयोग नसेल तर बोलू नये नाहीतर आपली महत्त्वाची कामे राहून जातात.मी गोव्याला होतो तेव्हापासून २५ वर्षांपासून माझा कवितासंग्रह पडलेला होता ते काम पूर्ण करणे या मूर्ख लोकांच्या नादाला लागण्यापेक्षा बरे आहे असे मत भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केले आहे.तसेच आपली माणसे जगभरात चमकत आहेत ही नैसर्गिक गोष्ट आहे.ते इतक्या पिढ्या तिथे राहिले तर त्यांनी तिथे चमकणे आवश्यकच आहे.खरतर तो तिथल्या लोकांचा मोठेपणा आहे आपला नाही.आपल्याकडे इतके चांगले लोक असताना आपण निवडून देत नाहीत.आपल्याकडे पूर्वी मौलाना आझाद यांच्यासारखे लोक होते तो आपला मोठेपणा होता तसा मोठेपणा आज आपल्यात राहिला नाही.आपण आपल्यातील क्षुद्र लोक वरती पाठवायला लागलो.दुसऱ्या जाती-धर्माच्या लोकांना आपण परके समजून त्यांना लायकी असून लायकी देत नाही हे आपले चुकत आहे असे स्पष्ट मत भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केले आहे.