यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी) :-
येथील ग्रामीण भागातील दळणवळणाच्या क्षेत्रात एक मोठे साधन समजली जाणारी आपण सर्वाची आवडती लालपरी यंदाच्या रमजान व अक्षय तृतीया सणांच्या शुभमुहूर्तावर गावाकडे येणाऱ्या प्रवाशांना शासनाने दिलेल्या भाडे सवलतीमुळे महीलांसह अमृत जेष्ठ नागरीकांचा मिळाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसुन आले आहे.त्यामुळेच यंदा यावल आगाराने मागील चार दिवसात परतीच्या मार्गावर निघालेल्या प्रवाशांच्या भाडे उत्पन्नातून मागील उत्पन्नाचा टप्पा ओलांडला असुन अपेक्षा पेक्षा भरीव व अधिक चांगले उत्पन्न मिळाल्याची माहीती आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी दिली आहे.
यावल एसटी आगार हे मागील काही वर्षापासुन विविध समस्या व अडचणीनी ग्रस्त असुन एकुण ८३ एसटी बसेसची संख्या आवश्यक असलेल्या यावल आगारात फक्त ६३ एसटी बसेसवर अवलंबुन राहावे लागत आहे.त्यात अनेक बसेस या नादुरुस्त अवस्थेत व भंगार जमा झालेल्या अवस्थेत आहेत.अशा बिकट अवस्थेत असतांना देखील यावल एसटी आगाराला अमृत जेष्ठ नागरिक व महिला प्रवासी भाडे सवलतीच्या निर्णयाने लालपरीला जिवदान मिळाले आहे.मात्र येथील आगारातील बसेस व बसस्थानकाच्या ईमारतीची अवस्था ही अत्यंत वाईट झाली असुन यामुळे प्रवासाशी निगडीत गंभीर प्रश्नाकडे एसटी महामंडळाने लक्ष देणे गरजे झाले आहे.याशिवाय यावल तालुक्यातुन आपल्या वैद्यकीय शिक्षणासाठी नांदेड या ठीकाणी मोठया प्रमाणावर विद्यार्थी ये-जा करीत असल्यामुळे नांदेडहुन भुसावळपर्यंत येणारी बस ही यावल पर्यंत वाढविण्यात यावी अशी मागणी विद्यार्थी पालक व प्रवाशी वर्गातून करण्यात आली असुन तसे झाल्यास शैक्षणिक कार्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत सोयीचे होईल तरी या विषयावर एसटी विभागाने देखील लक्ष देणे गरजे असल्याचे प्रवाशी वर्गातून बोलले जात आहे.