Just another WordPress site

भिवंडीत तीन मजली इमारत कोसळून ४० ते ५० जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
भिवंडी येथील वलपाडा परिसरातील एक तीन मजली इमारत कोसळली असून या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली तब्बल ४० ते ५० रहिवासी अकडल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.आज दि.२९ एप्रिल २३ शनिवार रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे.दरम्यान पोलीस प्रशासन व अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून ढिगाऱ्याखाली दबलेल्या रहिवाश्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार भिवंडी येथे कैलास नगर भागातील वलपाडा परिसरात असलेल्या ‘वर्धमान कंपाऊंड’ नावाची तीन मजली इमारत असून या इमारतीच्या खाली एक गोदाम आहे तर वरच्या दोन मजल्यावर रहिवाशी वास्तव्यास आहेत.मात्र आज दि.२९ एप्रिल रोजी दुपारी दीडच्या सुमारास अचानक ही इमारत कोसळली असून या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ४० ते ५० रहिवासी अकडले असल्याची शक्यता प्रशासनाच्या वतीने वर्तविण्यात आलेली आहे.दरम्यान पोलीस प्रशासन व अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून ढिगारा हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.तसेच काही लोकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या ढिगाऱ्याखाली जखमी झालेल्या रहिवाश्यांची माहिती गोळा करण्याचे काम सुरु असल्याने प्रशासनाच्या वतीने अद्यापि जखमी रहिवाश्यांची नावे घोषित करण्यात आलेली नाही.
Leave A Reply

Your email address will not be published.