राजस्थान- नायक नायक(वृत्तसेवा):-गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूकचा विषय सम्पूर्ण देशभरात चर्चिला जात आहे.यात काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक तब्बल २० वर्षांनी होत आहे.काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत,राहुल गांधी व मुकुल वासनिक यांची नावे चर्चित आहेत.अशात काँग्रेस अध्यक्षपदासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे नाव आघाडीवर असतानाच आता राजस्थान काँग्रेस कमेटीने मात्र राहुल गांधी यांचीच काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करावी असा एकमताने ठराव मंजूर केला आहे. राजस्थान काँग्रेस कमेटीची नुकतीच बैठक झाली यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
यावेळी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे राजस्थानच्या बाहेर जाण्यास इच्छुक नसल्यामुळे त्यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविण्यास नकार दिला आहे.यात राहुल गांधी यांनीच अध्यक्षपदाची धुरा सांभाळावी अशी इच्छा खुद्द अशोक गेहलोत यांची आहे अशी माहिती राजस्थानचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रतापसिंह खाचरियावास यांनी दिली आहे. त्याचबरोबर पक्षातील सर्व सदस्यांचे मत लक्षात घेऊनच आम्ही राहुल गांधी यांना पाठिंबा देत आहोत असेही त्यांनी सांगितले आहे.त्यामुळे राहुल गांधी यांना काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करावी असा ठराव मंजूर करणारे राजस्थान हे पहिले राज्य ठरले आहे.काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणुकीबाबतची प्रक्रिया सुरु झाली आहे.यात २२ सप्टेंबर २२ ला निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात येईल.१७ ऑक्टोबर २२ ला मतदान तसेच १९ ऑक्टोबर २२ ला मतमोजणी होणार आहे.काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत,राहुल गांधी व मुकुल वासनिक यांची नावे चर्चित असतांना मात्र राहुल गांधी या पदाकरिता इच्छुक नसल्याबाबची माहिती समोर आली आहे.त्यामुळे अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागेल याची उत्सुकता अजून कायम राहिली आहे.