Just another WordPress site

“भगवान राम आणि हनुमान यांच्यासह शेतकरीसुद्धा माझे दैवत”-आमदार रवी राणा

अमरावती-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

अमरावती जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निकालावर बोलताना काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी अपक्ष आमदार रवी राणा यांच्यावर जोरदार टीका केली होती.या निवडणुकीत हनुमान चालिसेचा गैरवापर करणाऱ्यांना व रंग बदलवणाऱ्या सरड्यांना शेतकऱ्यांनी धडा शिकवला आहे असे म्हटले होते.दरम्यान या टीकेला आता आमदार रवी राणा यांनी प्रत्युत्तर दिले असून सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत “भगवान राम व हनुमान आमच्या हृदयात आहेत” अशी त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.हनुमान चालिसा म्हटल्यावर महाविकास आघाडीने आम्हाला तुरुंगात टाकले होते.यशोमती ठाकुरांना हनुमान चालिसा व भगवान राम आवडत नसेल तर तो त्यांच्या प्रश्न आहे परंतु आम्ही कोणत्याही परिस्थिती हनुमान चालिसा म्हणणारच आहोत कारण भगवान राम व हनुमान हे आमचे दैवत आहेत असे प्रत्युत्तर रवी राणा यांनी यशोमती ठाकूर यांना दिले आहे.शेतकरी संकटात असताना मी अनेकदा आंदोलने केली असून या आंदोलनांची सुरुवात मी तुकडोजी महाराजांच्या समाधीस्थळापासून केली होती तेव्हा यशोमती ठाकूर यांनी सत्तेचा गैरवापर करत मला तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी मी सहा दिवस तुरुंगात होतो त्यामुळे भगवान राम आणि हनुमान यांच्यासह शेतकरीसुद्धा माझे दैवत आहे असेही ते म्हणाले.

बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकऱ्यांनी यशोमती ठाकूर यांना सत्ता दिली आहे त्याचा वापर त्यांनी आता शेतकऱ्यांच्या भल्यासाठी करावा. मात्र जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा आम्ही शेतकऱ्यांसाठी पुन्हा आंदोलन करू अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे.दरम्यान बाजार समितीच्या निकालावर बोलताना आमदार यशोमती ठाकूर यांनी रवी राणा यांच्यावर जोरदार टीका केली होती.शेतकऱ्यांना खरे काय व खोटे  काय याची जाणीव आहे.हनुमान चालिसेचा गैरवापर व चांदीचं नाणे वाटणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांनी मतदान केले आहे अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली होती तसेच रवी राणा यांचा पक्ष हा व्यापाऱ्यांचा पक्ष आहे त्यांना शेतकऱ्यांचे हित माहिती नसून हनुमान चालिसेचा गैरवापर करणाऱ्यांना व रंग बदलवणाऱ्या सरड्यांना शेतकऱ्यांनी धडा शिकवला आहे असेही यशोमती ठाकूर म्हणाल्या होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.