बेळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
राज्यातील ४० टक्के कमिशन उघडकीस आल्याने भारतीय जनता पक्षाची पोलखोल झाली असून केंद्र व राज्य सरकारची प्रतिमा मलीन झाली आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सत्तांतर अटळ असून कॉंग्रेसला १३० जागा मिळतील असा विश्वास महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज कॉंग्रेस भवनमधील पत्रकार परिषदेत केला आहे.पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की,‘‘केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आहे.डबल इंजिन सरकारमुळे विकासाला गती मिळेल असे वाटत होते मात्र डबल भ्रष्टाचार सुरु आहे.अदानी कंपनीत २० हजार कोटी रुपयांची बेनामी गुंतवणूक,निकटर्वती उद्योजकांसाठी पोषक निर्णय घेण्यात आल्याबाबतचा विषय राहुल गांधी यांनी उपस्थित केल्यामुळे त्यांच्यावर मानहानी दावा दाखल करून खटल्यात गुंतविले याची कल्पना मतदारांना आहे त्यामुळे कर्नाटकात काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता येईल परिणामी १३० पेक्षा अधिक जागा पक्षाला मिळतील असे त्यांनी म्हटले आहे.
कर्नाटक देशातील महत्वाचे राज्य असून विकासात बेंगळूरचे योगदान महत्वाचे आहे परंतु ४० टक्के कमिशनची पोलखोल झाल्यामुळे राज्याची प्रतिमा मलिन झाली आहे.ठेकेदाराकडे लाच मागितल्याची तक्रार पंतप्रधानांकडे करण्यात आली परंतु दुदैवाने कारवाई झाली नाही. मंत्री ईश्वरप्पा यांची उचलबांगडी झाली त्यांच्या चौकशीचे नाटक करत क्लीन चिट देण्यात आली यातून दडपशाही,हुकूमशाही वाढल्याचे जाणवित आहे व यामुळे जनतेने योग्य निर्णय घेण्याची गरज आहे असे चव्हाण यांनी सांगितले आहे.यावेळी काँग्रेस निरीक्षक नवाजुद्दीन, जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी,सलीम खतीब आदी मान्यवर उपस्थित होते.