यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
राज्य शासनाच्या वतीने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनातर्फे सर्वसामान्य नागरीकांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी या दृष्टीकोणातुन यावल येथे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला.
येथील श्री स्वामी समर्थनगर परिसरात १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्ताने राज्यातील २५ ते ३० हजार वस्तीच्या शहरी भागातील नागरीकांना आपल्या उपचारासाठी घरापासुन लांब जावुन उपचारासाठी भटकंती करावी लागते यासाठी दवाख्यान्यापासुन लांब राहणाऱ्या नागरीकांना त्वरीत उपचार व आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी या हेतुने शासनाच्या वतीने संपुर्ण राज्यातील शहरी भागात ५०० ठीकाणी दवाखाने उघडण्याची संकल्पना राबवून एक उत्कृष्ठ पाऊल उचलले आहे.या योजनेअंतर्गत रूग्णांची विनामुल्य १७५ प्रकारच्या विविध वैद्यकीय चाचण्या व मोफत उपचार होणार असुन यासाठी शासनाच्या वतीने “हिन्दुह्ययसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” सुरू करण्यात आले आहे.या दवाखान्याचा शुभारंभ ग्रामीण क्षेत्रात आपल्या उत्कृष्ट आरोग्य सेवेने ओळखले जाणारे यावल तालुक्यातील हिंगोणा येथील प्राथमिक केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.फिरोज एम.तडवी यांच्या हस्ते फीत कापून व धन्वंतरी पूजन करून करण्यात आले.यावेळी डॉ.अमोल रावते,डॉ.राहुल गजरे,डॉ.अर्चना पाचपोळे,आरोग्य कर्मचारी जयंत पाटील,नरेंद्र तायडे,आशिष शिंदे,सौ वारके,प्रतिभा ठाकूर,शकील तडवी यांच्यासह श्री स्वामी समर्थनगर परिसरातील नागरीक उपस्थित होते.