यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
येथील यावल ते भुसावळ मार्गावरील शहरातील टी पॉईंटवर सम्राट मॉलसमोर तसेच जुन्या भुसावळ नाक्याच्या वळणावर रस्त्याच्या मध्यभागी मोठमोठे जिव घेणे खड्डे निर्माण झाल्याने वाहनधारकांना या खड्डयांमुळे मोठा त्रास सोसावा लागत असुन सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावरील पडलेल्या खुडयांची तात्काळ दुरूस्ती करावी अशी मागणी वाहन धारकांकडुन करण्यात आली आहे.
यावल ते भुसावळ या मार्गावर गावाबाहेरील जुना भुसावळ नाक्याच्या धोकादायक वळणावर तसेच शहरातील भुसावळ टी पॉईंट या मुख्य चौकाजवळ रस्त्याच्या मध्यभागी फार मोठमोठे जिवघेणे खड्डे निर्माण झाले आहेत.वाहनांची मोठी वर्दळ असणारा हा प्रमुख मार्ग असुन या ठीकाणी वाहनधारकांना वाहन चालवितांना खड्डा वाचविण्यासाठी आपला जिव धोक्यात टाकुन वाहन चालवितांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.तसेच खड्डा वाचवितांना या ठीकाणी भिषण अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने या प्रश्नाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरीत लक्ष देवुन या रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यांची तात्काळ दुरुस्त करून या खड्ड्यांमुळे होणारे संभाव्य अपघात टाळावे अशी मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.