यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी) :-
तालुक्यातील न्हावी येथील शेत शिवारात विहिरीला लावलेल्या जाळीवर बसून काम करीत असतांना अचानक तोल सुटून विहिरीत पडल्याने तरूण शेतकऱ्याचा दुदैवी मृत्यु झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की,तालुक्यातील न्हावी येथील शेतकरी गिरधर खिलचंद नेहते वय ३४ वर्ष हे दि.५ मे शुक्रवार रोजी न्हावी शेत शिवारातील गावालगत असलेल्या आपल्या शेतात काम करीत असतांना त्या तरूणाचा तोल सुटुन विहीरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.याबाबत फैजपूर पोलिसांना माहिती दिल्यानंतर मरण पावलेल्या तरूणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी यावल रूग्णालयात आणुन त्याच्यावर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.मोहीनी भुगवाडया यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले.मयत तरुण शेतकरी गिरधर नेहेते यांच्या पश्चात वयोवृद्ध आई,पत्नी,एक मुलगा असा परिवार आहे.या घटनेची खबर फैजपूर पोलिस ठाण्यात दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास फैजपूर सहायक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राजेश बऱ्हाटे करीत आहे.