जळगाव- नायक नायक (प्रतिनिधी):-राज्याचे मुख्यमंत्री हे उद्या दि.२० सप्टेंबर २२ मंगळवार रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यादरम्यान त्यांच्या हस्ते धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे लोकार्पण सोहळा व मुक्ताईनगर मुक्ताईनगर येथे जाहीर सभा या कार्यक्रमांसोबतच पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी अशा कार्यक्रमांचे आयोजन राहणार आहे.
मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जळगाव जिल्हा दौऱ्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा पुढीलप्रमाणे राहील. दुपारी.३ वाजता जळगाव विमानतळावर आगमन व तेथून पाळधी ता.धरणगाव कडे प्रयाण,दुपारी.३.४५ वाजता पाळधी येथे आगमन,दुपारी.४ वाजता पाळधी येथील शासकीय विश्रामगृह नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा,सायंकाळी ४.३० वाजता पाळधी वरून मोटारीने मुक्ताईनगर कडे प्रयाण,सायंकाळी ५.३० वाजता मुक्ताईनगर येथे आगमन व जाहीर सभेला उपस्थिती,रात्री मुक्ताईनगर येथून सोईनुसार जळगाव विमानतळाकडे प्रयाण व तेथून शासकीय विमानाने मुंबईकडे रवाना असा दौरा कार्यक्रम राहणार आहे.या दौऱ्यानिमित्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी महत्वाच्या ठरणार आहे.