छत्रपती संभाजीनगर-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेली नॅशनल एलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट (नीट) ही प्रवेश परीक्षा रविवारी ७ मे २३ रोजी राज्यभरात ठिकठिकाणच्या केंद्रांवर सुरळीत पार पडली.यावर्षी नीट युजी २०२३ परीक्षेत तब्बल १८ लाख ७२ हजार ३४१ विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे.देशभरातील ४९९ शहरामध्ये तसेच देशाबाहेरील १४ शहरामध्ये नीट युजी २०२३ परीक्षा घेण्यात आली.या परिक्षेसाठी शहरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा ग्रामीण भागातील केंद्रांवर तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा शहरातील परीक्षा केंद्रावर घेण्यात आली यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांचा जाण्या-येण्याचा प्रवास खर्च वाढला आहे.देशभरातील विविध शहरांतील परीक्षा केंद्रांवर एकाच वेळी ऑफलाईन पद्धतीने ही परीक्षा घेण्यात आली.परीक्षेसाठी महाराष्ट्रात सात लाख विद्यार्थी बसलेले असल्याने परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेण्यात आली.परीक्षा केंद्रात जाण्यापूर्वी मेटल डिटेक्टरद्वारे विद्यार्थ्यांची तपासणी झाल्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला तसेच विद्यार्थ्यांना कोणतेही इलेक्ट्रॉनिक साहित्य घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली होती तर सकाळी ११.३० पर्यंत विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे अशाही सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आल्या होत्या.
सदरील वैद्यकीय अभ्यासक्रमातील एमबीबीएस,बीडीएस,बीएएमएस,बीएसएमएस,बीयूएमएस व बीएचएमएस या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी संयुक्तरित्या नीट परीक्षा घेतली जाते त्याअनुषंगाने नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे अखिल भारतीय स्तरावरील महत्वांच्या परीक्षांचे आयोजन करण्यात आले.सदर परीक्षेसाठी हॉल तिकीट एनटीएच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले होते.या परीक्षेतील १८० प्रश्नांसाठी ७२० गुण वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांतील प्रथम वर्ष प्रवेशासाठी नीट परीक्षा अनिवार्य असल्याने नीट परीक्षा लेखी स्वरूपात दुपारी २ ते ५.२० या वेळेत नीट परीक्षा घेण्यात आली.या परीक्षेत बायोलॉजी,फिजिक्स व केमिस्ट्री या तीन विषयांवर एकूण १८० प्रश्नांवर एकूण ७२० गुणांसाठी ही परीक्षा घेण्यात आली अशी माहिती जिल्ह्यातील परीक्षा आयोजकांनी दिली आहे.यात गंगापूर शहरातील माॅडर्न इंग्रजी शाळेतील परिक्षा केंद्रांतून ४८० भावी डॉक्टरांनी परीक्षा दिली.या परिक्षा केंद्रांवर प्रभारी सपोनी शाईनाथ गिते,सपोनी अशोक चौरे,पोलिस उपनिरीक्षक अझर शेख,मेजर गुंजाळ,पोहेका अमीत पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला.