“बालविवाह प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरीकांच्या सहकार्याची गरज”
महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी अर्चना आटोळे यांचे प्रतिपादन
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
तालुक्यात व परिसरात गेल्या काही दिवसापासुन बालविवाह लावण्याचे प्रकार वाढल्याचे दिसून येत असुन बालविवाह प्रतिबंधक कायदा कितीही प्रभावी असला तरी त्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी गावपातळीवर किंवा शहरी क्षेत्रात अशा प्रकारचे होणारे बालविवाह रोखण्यासाठी खऱ्या अर्थाने समाजहित जोपासणाऱ्या नागरीकांच्या सहकार्याची गरज असल्याचे मत येथील महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी अर्चना आटोळे यांनी व्यक्त केले आहे.
सध्या तालुक्यात व परिसरात बालविवाह होत असल्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून बालविवाह प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणेबाबतची माहिती देतांना महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी अर्चना आटोळे यांनी म्हटले आहे की,आपल्या तालुक्यात गावपातळी असो किंवा शहरी परीसर असो गेल्या काही दिवसापासुन काही ठिकाणी बालविवाह होत असुन यासाठी निव्वळ चर्चा न करता आपण एक सुज्ञ नागरीक म्हणुन जर आपल्या समोर कुठेही बालविवाह होत असेल तर एक सामाजीक कर्तव्य म्हणुन आपण तात्काळ संबधीत अधिकाऱ्यांच्या निर्दशनास आणुन समाजहित जोपासण्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे.तसेच बालविवाह प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आपले शहर व आपले गाव बालविवाह मुक्त करण्यासाठी आपल्या सहकार्याशिवाय हे शक्य नसल्याचे प्रतिपादन महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी अर्चना आटोळे यांनी केले आहे.